Navratri 2022: घट बसवताना ‘या’ गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवाव्यात...

नारी शक्तीचे आणि कृषी संस्कृतीचे वैभव सांगणारा नवरात्रीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्या.
Navratri 2022
Navratri 2022Esakal

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी केली जाणार आहे.

शारदीय नवरात्री काळात घरोघरी घट बसवला जातो. ही घट बसविण्याची पद्धत वेगवेगळ्या प्रांतात वेगळी असली तरीही त्याबाबतच्या काही शास्रानुसारच्या गोष्टी आपल्याला माहित असायलाच हव्यात. नारी शक्तीचे आणि कृषी संस्कृतीचे वैभव सांगणारा नवरात्रीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्या. चला तर मग घट बसवताना कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवाव्यात याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

Navratri 2022
Navratri 2022 : नवरात्रीमध्ये 'या' मंत्रांच्या जपाने होते धनप्राप्ती

● नवरात्रमहोत्सवात आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. 

● शेतातील माती आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (पाच किंवा) सप्तधान्ये टाकवी. 

● जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे इ.मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दुर्वा, अक्षता, सुपारी, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू टाकाव्यात.

Navratri 2022
Navratri 2022: नवरात्रीत हे सहा यज्ञ का केले जातात?

● सप्तधान्ये आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. 

● कलशामध्ये माळ पोहोचेल अशा पदी ती माळ बांधावी.

● अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रोत्सव साजरा करावा.

Navratri 2022
Navratri 2022: देवी आणि देवी तत्त्व या संकल्पनेचा काय आहे इतिहास?

आता बघू या देवीची ओटी नेमकी कशी भरावी?

1) देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

2) दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

Navratri 2022
Navratri 2022: नवरात्रीत उपवास का करावा?

3) देवीकडून चैतन्य मिळावे व आपली अध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी देवीला मनोभावे प्रार्थना करावी.

4) साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. 

5) तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com