Navratri 2022 | देवीच्या आगमनानंतर करु नये ही कामे, घटस्थापनेपुर्वी उरकून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navratri festival

Navratri 2022 | देवीच्या आगमनानंतर करु नये ही कामे, घटस्थापनेपुर्वी उरकून घ्या

शारदीय नवरात्रोत्सवाला 26 सप्टेंबर पासून प्रारंभ होत. आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त सण साजरे होत असल्याने सर्वत्र चैतन्य निर्माण झाले आहे. घटस्थापनेने घरोघरी देवीचे आगमन होणार आहे. या नवरोत्रोत्सावात देवीचे उत्साहात स्वागत करण्यापुर्वी घरातील काही कामे त्वरित उरकून घ्यावी. ज्याने देवीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहील. (Navratri 2022 works should be completed before Ghatasthapana Durga Devi arrival)

हेही वाचा: Navratri 2022: जोगवा का मागितला जातो ?

1) शारदीय नवरात्रोत्सवात आपल्या घरी घटस्थापना म्हणजेच देवीचे आगमन होते. देवीच्या आगमनाने घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. मात्र देवीच्या आगमनापुर्वी घरात सर्वत्र स्वच्छता करुन घ्यावी.

2) घरात स्वच्छता केल्यानंतर आपल्या परंपरेनुसार घरात सर्वप्रथम गोमुत्र आणि गंगाजल शिंपडावे. घराच्या प्रवेशद्वारावर देवीच्या स्वागतासाठी श्री. स्वस्तीक, शुभ आणि लाभ लिहावे.

हेही वाचा: Sharadiya Navratri 2022: नवरात्रीचे नऊ दिवस वास्तुशास्त्रातल्या या गोष्टींचे पालन केल्याने देवीचा आशीर्वाद मिळू शकतो

3) देवीच्या आगमनासोबत घरात चैतन्य लहरींचा प्रवेश होतो. या काळात घरात कुठलेही दुरुस्तीचे काम करु नये.

4) घरात देवीच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झालेले असते. त्यामुळे या काळात दाढी- केस कापणे यासह नख कापणे अशी कामे वर्जित करावी. शक्यतो घटस्थापनेपुर्वी ही कामे उरकून घ्यावी.

हेही वाचा: Navratri 2022: नवरात्रीचे उपवास अपचनाचे कारण ठरू शकतात,करा या टीप्स फॉलो