
पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी केली जाणार आहे.
असं म्हटलं जात की, नवरात्रात अखंड ज्योत (Akhand Jyoti) पेटविली पाहिजे. ही ज्योत 9 दिवसांचा उपवास संपेपर्यंत जळत राहिली पाहिजे.
ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रीमध्ये देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यामागे महत्त्वपूर्ण कारण आहे.असा विश्वास आहे की, अगदी गडद अंधारात एक छोटा दिवा त्याच्याभोवती असलेला अंधकार दूर करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो. या दिव्याप्रमाणेचं देवीच्या भक्तांनादेखील आपल्या श्रद्धेने त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणं शक्य होऊ शकतं.
नवरात्रीमध्ये सुवासिनी नऊ दिवसांचा उपवास करतात. याशिवाय देवीचे भक्त असणारे पुरुषदेखील नऊ दिवसांचा उपवास पकडतात.नवरात्रीच्या काळात महिला साज-श्रृंगार करून गरबा, दाडिंया खेळतात. नवरात्री उत्सवात अनवानी देवीच्या मंदिरात जाण्याचीदेखील परंपरा आहे. याशिवाय या काळात लावण्या जाणाऱ्या दिव्याचेदेखील विशेष महत्त्व आहे. देवीमातेसमोर लावण्यात आलेला हा दिवा नऊ दिवस प्रज्वलित ठेवला जातो.
● नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी नेहमीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचा दिवा निवडा.
● आपण मातीपासून बनवलेला दिवादेखील निवडू शकता.
● माती आणि पितळाचे दिवे पूजेसाठी शुद्ध मानले जातात.
● अखंड दिवा नेहमी उंच ठिकाणी ठेवा.
● हा दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका.
● पूजेचा दिवा लावण्यापूर्वी सपाट किंवा स्टूलवर उंच ठिकाणी ठेवण्यापूर्वी गुलाल किंवा तांदळाने अष्टदल बनवा.
● नवरात्रातील या अखंड दिव्याची वात रक्षा सूत्राने बनली जाते.
● ही वात बनवण्यासाठी दीड हात संरक्षण धागा घ्या आणि त्याची वात बनवा.ही वात दिवाच्या मध्यभागी ठेवा.
● तुम्ही या दिव्यात तूप, मोहरी किंवा तीळाच्या तेलाचा वापर करू शकता.
● तुम्ही जर तूपाचा दिवा लावत असाल तर, तो देवीच्या उजव्या बाजूस ठेवावा.
● तसेच जर दिवा तेलाचा असेल तर, तो देवी देवीच्या डाव्या बाजूला ठेवला पाहिजे.
● हा अखंड दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती, देवीमाता आणि भगवान शिव यांचे ध्यान नक्की करायला हवे.