Navratri Festival 2019 : शैक्षणिक सुधारणांतून राष्ट्राची प्रगती!

अभय जेरे
Thursday, 3 October 2019

प्रस्तावित नव्या शिक्षण धोरणात (एनईपी) ही स्थिती सुधारण्यासाठी पहिली ते पाचवीच्या वर्गांतील अभ्यासक्रम आणि वेळापत्रकांची पुनर्मांडणी करण्याची सूचना केली आहे. यातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा होऊन राष्ट्राची प्रगती होईल, अशी अपेक्षा आहे. 

नवरात्री

शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता आणि गणिती ज्ञानाचा अभाव आहे. वाचन, आकलन क्षमता आणि बेरीज आणि वजाबाकी यांत विद्यार्थी कमी पडतात. प्रस्तावित नव्या शिक्षण धोरणात (एनईपी) ही स्थिती सुधारण्यासाठी पहिली ते पाचवीच्या वर्गांतील अभ्यासक्रम आणि वेळापत्रकांची पुनर्मांडणी करण्याची सूचना केली आहे. यातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा होऊन राष्ट्राची प्रगती होईल, अशी अपेक्षा आहे. 
 
दरवर्षी कोर्नेल विद्यापीठ, आयएनएसईएडी आणि जागतिक बौद्धिक संपदा संघटना (डब्ल्यूआयपीओ) संयुक्तपणे जगभरातील देशांची, त्यांची कल्पकता क्षमता आणि त्याचे परिणाम या संदर्भातील द ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (जीआयआय) ही क्रमवारी जाहीर करतात. मागील काही वर्षांत ‘जीआयआय’ त्यात काही दोष असूनही, कल्पकतेसाठीचे (इनोव्हेशन) आघाडीचे मानक समजले जाते. ‘जीआयआय’च्या आराखड्यातील सर्वांत चांगली बाब म्हणजे त्यातील काही निकष कल्पकतेच्या मूल्यांकनाच्या पारंपारिक मोजमापाच्या पलीकडे जातात. उदाहणार्थ संशोधन आणि विकास यांचा स्तर.

भारतासह अनेक देश नोव्हेशनची आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका असल्याचे स्वीकारू लागले असून, जीआयआयच्या क्रमवारीला गांभीर्याने घेत आहेत. यंदाच्या क्रमवारीत    विचार करण्याची क्षमता ही कौशल्ये आपल्या शिक्षणाच्या अविभाज्य अंग बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन, आयडिया स्पर्धा, टेक चॅलेंजेस, संस्थांचे इनोव्हेशन कौन्सिल, प्री-इन्क्युबेशन बूट कॅम्प आदी उपक्रम या दिशेने केलेले प्रयत्न आहेत आणि त्याची फळे आता दिसू लागली आहेत. मनुष्यबळ आणि संशोधन या निर्देशांकाच्या बाबतीत भारताची कामगिरीचा विचार करता, शालेय शिक्षण, शिक्षणावरील खर्च, वाचनाचे मूल्यांकन, गणित, विज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांचे प्रमाण या तीन उपनिकषांच्या बाबतीत आपली कामगिरी फारच खराब आहे. वाचनाचे मूल्यांकन, गणित आणि विज्ञान कौशल्यांच्या बाबतीत चीनची कामगिरी उत्तम आहे. फारच चांगली कामगिरी करतो आहे. या उपनिकषांमध्ये भारताचा क्रमांक ७१वा आहे, तर चीन आठव्या क्रमांकावर आहे. मनुष्यबळ आणि संशोधन या निर्देशांकात चीनचा क्रमांक तेरावा असून, भारताचा क्रमांक ११०वा आहे.

आपल्या विद्यार्थ्यांची वाचन कौशल्य आणि गणित व विज्ञान कौशल्याचा बाबतीत अनेक अंतर्गत आणि बाह्य पाहण्यांमध्ये याच प्रकारचे निष्कर्ष समोर आले आहेत. सध्या प्राथमिक शाळांत पाच कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, त्यांच्याकडे मूलभूत स्वरूपाची साक्षरता आणि गणिती ज्ञान यांचा अभाव आहे. वाचन, आकलनक्षमता आणि बेरीज आणि वजाबाकी यांत विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा अभाव आहे. प्रस्तावित नवे शिक्षण धोरण (एनईपी) या समस्येविषयी संवेदनशील आहे. या संदर्भातील समस्येचे स्वरूप आणि त्यावरची उपाययोजना यांवर या धोरणात एक प्रकरण समाविष्ट आहे. मूलभूत साक्षरता आणि गणिती ज्ञानासंदर्भात पहिली ते पाचवीच्या शाळांमधील अभ्यासक्रम आणि वेळापत्रकांची पुनर्मांडणी करण्याची सूचना नव्या धोरणात केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि गणित याविषयी आवड निर्माण करण्याचा हेतू त्यामागे आहे.

नव्या शिक्षण धोरणाने पहिली, दुसरी आणि तिसरीसाठी दररोज एक तास फक्त गणित आणि वाचनासाठी देण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर चौथी आणि पाचवीच्या वर्गांसाठी लिखाणासाठी अतिरिक्त तास ठेवण्याची सूचना केली आहे. उपाहार आणि जेवणाच्या सुट्टीदरम्यानची वेळ या विषयांसाठीचा सर्वोत्तम वेळ ठरू शकते. शाळा भाषा आणि गणित आठवड्यांची मांडणी करतील. यातून विद्यार्थी भाषा आणि गणिताशी संबंधित निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील. भाषा आणि गणिताशी संबंधित आठवड्याप्रमाणेच इतर असंख्य सूचना करण्यात आल्या आहेत.

नव्या शिक्षण धोरणाच्या सर्व सूचनांचा उल्लेख करणे आणि चर्चा करणे मर्यादित जागेत शक्य नाही. भारताला पुढील पाच वर्षांत जीआयआयच्या क्रमवारीत पहिल्या २५ क्रमांकामध्ये स्थान मिळवण्याची इच्छा असल्यास आपल्याला आपली सध्याची शिक्षणव्यवस्था बदलण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. सुदैवाने, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या दिशेने याआधीच अनेक पावले उचलली आहेत. त्यातून लवकरच मोठे यश मिळेल अशी आशा करूयात...
(क्रमश:)

(लेखक केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयात  चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Abhay Jere article nation progress through educational reforms

Tags
टॉपिकस
Topic Tags: