नवरात्रात कोल्हापूरला जाताय? 'ही' ओळखपत्रे जवळ बाळगा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - नवरात्रोत्सवासाच्या काळात ओखळपत्राविना पर्यटक यात्री निवासात अढळल्यास थेट लॉज अगर यात्री निवास मालकावर कारवाई करण्याची भूमिका जुना राजवाडा पोलिसांनी घेतली आहे. उत्सव काळात लॉज व यात्री निवासची कोणत्याही क्षणी तपासणी केली जाणार आहे. 

कोल्हापूर - नवरात्रोत्सवासाच्या काळात ओखळपत्राविना पर्यटक यात्री निवासात अढळल्यास थेट लॉज अगर यात्री निवास मालकावर कारवाई करण्याची भूमिका जुना राजवाडा पोलिसांनी घेतली आहे. उत्सव काळात लॉज व यात्री निवासची कोणत्याही क्षणी तपासणी केली जाणार आहे. 

नवरात्रोत्सवात लाखो भाविक अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येतात. यंदा या उत्सवात विधानसभा निवडणूक असल्याने भाविकांची संख्येत दुप्पटी तिप्पटीने भर पडण्याची शक्‍यता आहे. काश्‍मिरमध्ये दहशतवाद्यानी डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर अंबाबाई मंदिरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंदिराच्या सुरक्षीततेसाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दहशतवाद विरोधी पथकाकडून मंदिराची दररोज तपासणी केली जात आहे. येथील बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील लॉज्‌स, यात्री निवासांचे मोठ्या प्रमाणावर बुकींग करण्यात आल्या आहेत. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर लॉज्‌स आणि यात्री निवास आहेत. 

नवरात्रोत्सवात सुरक्षिततेचा भाग म्हणून यात्री निवासात उतरणाऱ्या पर्यटकांच्याकडून ओळखीचा पुरवा घ्या अशा लेखी आदेश जुना राजवाडा पोलिसांनी हद्दीतील लॉज व यात्री निवास मालकांना दिले आहेत. पर्यटक कुटुंबातील किमान एका दोघांचे ओळखपत्राचा पुरावा घेतल्याशिवाय आता मालकांना पर्यटकांना राहण्यासाठी जागा देता येणार नाही. जुना राजवाडा पोलिसांच्या विशेष पथकाकडून नवरात्रोत्सव काळात दिवसातून कोणत्याही क्षणी तपासणी केली जाणार आहे. यात जर ओळखीच्या पुराव्या विना पर्यटक अढळल्यास संबधित यात्री निवास व लॉज मालकावर कारवाई केली जाणार आहे. 

जुना राजवाडा हद्दीतील स्थिती... 
लॉजची संख्या - 53 
यात्री निवास संख्या - 58 

संशयास्पद हलचाली ओळखा.. 
नवरात्रोत्सव काळात एकाद्या पर्यटकाच्या हलचाली जर संशयास्पद वाटल्या तर याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी अशा सूचनाही जुना राजवाडा पोलिसांकडून हद्दीतील लॉज व यात्री निवास मालकांना देण्यात आल्या आहेत. 

ओळखपत्राचा पुरावा न देता पर्यटक यात्री निवास अगर लॉजमध्ये अढळल्यास संबधित मालकावर 188 अन्वये कारवाई करण्यात येईल. या कारवाई अंतर्गत सहा महिन्यापर्यंतची शिक्षा आणि एक हजार रूपये दंडाची तरतुद आहे. तसेच यात्री निवासाचा परवानाही रद्द होऊ शकतो. 
- प्रमोद जाधव,
पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 identity card compulsory for passenger accommodation