करवीर निवासिनी श्री अंबाबाईची यमुनाष्टक रूपात पूजा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज श्री अंबाबाईची यमुनाष्टक रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. मंदिरात भाविकांची गर्दी आता वाढू लागली असून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या दोन दिवसात गर्दीचा उच्चांक होण्याची शक्‍यता आहे.

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज श्री अंबाबाईची यमुनाष्टक रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. मंदिरात भाविकांची गर्दी आता वाढू लागली असून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या दोन दिवसात गर्दीचा उच्चांक होण्याची शक्‍यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने योग्य ती खबरदारी घेतली आहे. दरम्यान, उद्या (गुरूवारी) ललिता पंचमीनिमित्त त्र्यंबोली यात्रा होणार असून टेंबलाई टेकडीवरील मंदिरात श्री अंबाबाई त्र्यंबोलीदेवीच्या भेटीसाठी जाणार आहे. यानिमित्ताने टेंबलाई टेकडीवर दिवसभर यात्रा भरणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. 

आजच्या पूजेविषयी... 
आदि शंकराचार्यांनी रचलेले यमुनाष्टक म्हणजे यमुनेची स्तुती. त्यांच्या तीर्थयात्रेच्या काळात त्यांनी ही यमुनेची आठ श्‍लोकांमध्ये स्तुती रचली असावी. गंगेप्रमाणे यमुनेलाही हिंदू धर्मात वेगळे महत्व आहे. "हे देवी यमुने, तुझ्या काठी नंदनंदाच्या म्हणजेच कृष्णाच्या लीला घडल्या. तुझ्या काठी मल्लिका आणि कदंबाची फुले बहरलेली असतात. जे तुझ्या प्रवाहात स्नान करतात. त्यांना तू भवसागरातून पार करतेस. हे कलिंद पर्वताच्या मुली, कालिंदी, सदैव माझ्या मनाचा कलुषितपणा तू धुवून टाक, अशी या पूजेच्या निमित्ताने देवीला प्रार्थना केली जाते, अशी माहिती श्रीपूजक यांनी दिली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Karveer Nivasini Ambabai puja