करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पूजा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 October 2019

कोल्हापूर - नवरात्रोत्सवातील अष्टमीनिमित्त आज श्री अंबाबाईची अष्टादशभूजा महालक्ष्मी महिषासूरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.

कोल्हापूर - नवरात्रोत्सवातील अष्टमीनिमित्त आज श्री अंबाबाईची अष्टादशभूजा महालक्ष्मी महिषासूरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.

दरम्यान, उद्या (सोमवारी) नवमी असून मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद ठेवले जाणार असल्याचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जाहीर केले आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व भाविकांनी दर्शनरांगेतूनच दर्शनासाठी यावे, असे आवाहन समितीने केले आहे. 

आजची पुजा

दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्म्यातील मध्यम चरित्रामध्ये येणारा अष्टदशभूजा म्हणजेच अठरा हातांच्या महालक्ष्मी महिषासूरमर्दिनीचा ध्यानमंत्र. सर्व देवांच्या तेजासून उत्पन्न झालेली, उत्तम आणि श्रेष्ठ अशा लक्षणांनी युक्त म्हणून महालक्ष्मी. ती महिषासूराचा वध करण्यासाठी अवतार धारण करते आणि महिषाचा वध करून देवकार्य संपन्न करते, असे या पूजेचे महात्म्य असल्याचे श्रीपूजक मंदार मुनीश्‍वर, श्रीपद्म मुनीश्‍वर, मयुर मुनीश्‍वर, रवी माईनकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Karveer Nivasini Ambabai Puja