Navratri Festival 2019 : महिलांनी नाचविल्या सासनकाठ्या (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 October 2019

कोल्हापूर - हलगीचा ठेका आणि पिपाणीच्या सुरावर बेलेवाडी हूबळगी (ता.आजरा) येथील भावनेश्वरी मंदिरात चक्क गावातल्या महिलांनी शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सासनकाठ्या नाचवल्या. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सासनकाठ्या नाचवण्याची परंपरा आहे.

कोल्हापूर - हलगीचा ठेका आणि पिपाणीच्या सुरावर बेलेवाडी हूबळगी (ता.आजरा) येथील भावनेश्वरी मंदिरात चक्क गावातल्या महिलांनी शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सासनकाठ्या नाचवल्या. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सासनकाठ्या नाचवण्याची परंपरा आहे.परंतु हा सासनकाठ्या नाचवण्याचा भक्ती भाव फक्त पुरुषांच्या वाटणीचा; महिला भक्तांनी फक्त हा सोहळा पाहायचा, पण गत वर्षा पासुन मात्र या गावच्या काही महिलांनी निर्णय घेतला की या सासनकाठ्या आपल्या खांद्यावर घ्यायच्या आणि नाचवाच्या.

गावातल्या पुरुषांना प्रश्न उपस्थित केला की ' तुम्हा महिलांना हे जमेल का ?  पण महिला आपल्या हट्टावर अडुन बसल्या. शेवटी गावकऱ्यांनी या काठ्या महिलांच्या खांद्यावर टेकवल्या. 

गावाबाहेर चार किलोमिटर अंतरावर डोंगरात देवीचे पुरातन मंदीर आहे. दस-या निमित्य  गावातील भाविक देवळात नऊ दिवस थांबतात. यावेळी गावातील मानाच्या सासनकाठ्या या ठिकाणी येतात.या मंदिरात गावातून ९ सासनकाठ्या येतात. शंभर वर्षापासून ही परंपरा सुरु आहे. काठीची उंची १७ ते२० फूट असते. काठीला सुती पांढरे कापड गुंडाळले जाते. या काठ्या आकर्षक पद्धतीने सजविल्या जातात.  

काठीला खालून पाच ते सहा फुटावर लाकडी दांडा असतो. तो खांद्यावर घेवून काठी नाचवली जाते. काठीच्या टोकाला दोरी बांधली जाते. ही दोरी एका हातात धरुन काठीला आधार द्यावा लागतो. हालगी आणि सनईच्या ( पिपाणी ) च्या तालावर काठी नाचवली जाते. ही काठी नाचवणे मोठ्या जिगरीचे व ताकदीचे काम मानले जाते. यामुळे शक्यतो ब-याच ठिकाणी पुरुषच या काठ्या नाचवतात. बेलेवाडीत महिलांनी काठ्या नाचविण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांनी  हे भक्ती भावाचे व ताकदीचे भक्ती कार्य अगदी लिलया पार पाडले. त्याच्या या निर्णयात गावकर्यांनी ही साथ दिली आणि त्यांचे कौतुक केले. 

नवरात्री वेळी आमच्या गावात हा सासनकाठ्या नाचवण्याची परंपरा आहे. दरवर्षी फक्त पुरुषच या काठ्या खांद्यावर घेऊन नाचावयचे पण गतवर्षी पासुन आम्ही ही या २० फुटी काठ्या खांद्यावर घेतल्या आणि पुरुषां प्रमाणेच नाचुन दाखवल्या. गावकर्यांनी ही आम्हाला यात साथ दिली. 

- वर्षा शिंत्रे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Sasankathya played by women