Navratri : पूराणांमध्ये महिशासूर मर्दिनीचे माहात्म्य, जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri

Navratri : पूराणांमध्ये महिशासूर मर्दिनीचे माहात्म्य, जाणून घ्या

लेखक : पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने.

Navratri : आदिमाया आदिशक्तीचा जागर अनादिकालापासून चालू असून वेद, उपनिषदे, रामायण, महाभारतात शक्तीचे प्रतीक म्हणून अनेकदा याचा उल्लेख आढळतो. वेदात देवी भगवतीची अनेक प्रार्थना सुक्ते आहेत. स्कंदपुराण, मार्कंडेयपुराण, देवी भागवतात अनेक अवतार कथा नमुद केलेल्या आहेत.

हेही वाचा: Navratri 2022: असुरांचा नायनाट करणाऱ्या षष्ठदुर्गा श्री महाकालीदेवीचा इतिहास..

दुष्ट शक्तींचा नायनाट करण्यासाठी आदिशक्तीने अवतार घेतलेले असून महिषासुराला मारण्यासाठी महिषासुरमर्दिनी, चंडमुंडाला मारण्यासाठी चंडिका आणि शुंभ-निशुंभाला मारण्यासाठी दुर्गारूपात आदिमाया प्रकट झालेली आहे.

हेही वाचा: Navratri 2022: चंद्रपूर श्री महाकाली देवीचा इतिहास

ब्रम्हा,विष्णू महेशाच्या क्रोधाग्नीतून महिषासुरमर्दिनी प्रकट झाली असा उल्लेख असून तिची विविध आयुधे नि अवयव कसे निर्माण झाले याबाबत मार्कंडेय पुराणात रंजक माहिती आहे.

हेही वाचा: Navratri 2022 : 25 वर्षांपासून महाराष्ट्रात गॅरेज चालवतेय केरळची दुर्गा शीला पुजारी

आदिमायेची ५१ शक्तीपीठे भारतात असून याची माहिती तंत्रचुडामणी या ग्रंथात आहे. दक्षप्रजापतीने आयोजित केलेल्या यज्ञसमारंभात त्याने शिवशंकराना आमंत्रित केलेले नव्हते. तरीही मातासती (शंकरांची पत्नी) या यज्ञ समारंभात पोहचली.

हेही वाचा: Navratri Recipe : साबुदाणा खाऊन कंटाळलात का? बनवा उपवासाचा केक अन् ढोकळा, जाणून घ्या रेसिपी

कारण माता सती ही दक्षप्रजापतीची कन्या होती. तेव्हा दक्ष प्रजापतीने आपल्या मुलीचा म्हणजे शंकराच्या पत्नीचा ,मातासतीचा अपमान करून शिवशंकराची निर्भर्त्सना केली. यामुळे अपमानित आणि क्रोधायमान मातासतीने तेथे चालू असलेल्या यज्ञात उडी घेतली.

हेही वाचा: Navratri 2022: नवरात्रामध्ये अष्टमीला का असते इतके महत्त्व?

हे वर्तमान ऐकून शिवशंकराने दक्षासह सगळ्या यज्ञाचा नाश करून आपल्या पत्नीचे म्हणजे मातासतीचे कलेवर सोबत घेऊन त्रैलोक्यात संचार चालू केला. हे तांडव पाहून श्रीविष्णूने सुदर्शनचक्र सोडून सतीमातेच्या कलेवराचे तुकडे केले. हे कलेवराचे ५१ तुकडे जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठे निर्माण झाली.

हेही वाचा: Navratri Festival : ‘गरब्यासाठी डीजेची आवश्यकता नाही’

महाराष्ट्रात आहेत हे चार शक्तिपीठे

१) कोल्हापूरची महालक्ष्मी

२) तुळजापूरची भवानीमाता

३) माहुरगडची रेणुकामाता सरस्वती

४) सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी माता भगवती.

हेही वाचा: Shardiya Navratri 2022 : तुम्हाला माहिती आहे का? नवरात्रीचा इतिहास श्रीरामाशी संबंधित, जाणून घ्या

देवीची रूपे

  • सौम्यरूप : उमागौरी, पार्वती, जगदंबा

  • उग्ररूप : दुर्गा, काली, चंडीका, भैरवी

  • महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही दुर्गेची तीन रूपे.

शिवपत्नी महाकाली तमोगुणी, महालक्ष्मी विष्णूपत्नी रज़ोगुणी नि महासरस्वती ब्रम्हदेवाची पत्नी सत्वगुणी स्वरूपात आहेत. अश्विन महिन्यात जे नवरात्र असते ते महिषासुरमर्दिनी अष्टभुजा देवीच्या पराक्रमाचे असते. महिषासुर नावाचा राक्षस त्रिभूवनात शक्तीमान झाला होता. त्यांच्या त्रासापुढे ब्रम्हा,विष्णू, महेशही त्रस्त झाले होते.

महिषासुराच्या अत्याचाराने क्रोधायमान झालेल्या ब्रम्हा, विष्णू, महेशाने आपल्या शक्तीबलाने एक देवी निर्माण केली व आपल्याकडील आयुधे, शक्ती तिला प्रदान करून महिषासुराला मारण्याच्या कामगिरीवर पाठवले. महिषासूर राक्षसाचे देवीबरोबरचे घनघोर युद्ध अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे नऊ दिवस चालले.

अखेर देवीने महिषासुराचा वध केला म्हणून देवीला महिषासुरमर्दिनी असे नाव पडले. महिषासुरमर्दिनी म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रूप म्हणून महिषासुरमर्दिनीच्या रूपात ब्रम्हाची पत्नी महासरस्वती, विष्णूची पत्नी महालक्ष्मी, महेशपत्नी महाकालीचा वास आहे.