Navratri: इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ II

इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या महाराणी ठरल्या. महाराणी एलिझाबेथ यांनी ७० वर्षे ब्रिटनवर सत्ता केली.
Queen Elizabeth
Queen Elizabeth sakal

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचं नुकतचं निधन झालं. 21 एप्रिल 1926 रोजी जन्मलेल्या महाराणी एलिझाबेथ यांचं आयुष्य एक प्रभावशाली आयुष्य होतं. जगातल्या सर्वात मोठ्या आणि जुन्या राजघराण्याची ही क्वीन जगासमोर एक अवलिया होती.

एडवर्ड आठवे यांनी राजीनामा दिल्यानंतर १९३६ मध्ये त्यांचे वडील ड्यूक जॉर्ज यांनी गादी सांभाळली. एलिझाबेथ यांचे वडील ड्यूक जॉर्ज हे राजेपदी असताना त्यांचा मृत्यू झाला. यानंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी एलिझाबेथ यांना राणी घोषित करण्यात आले. तेव्हापासून राजघराण्यावर एलिझाबेथ यांची सत्ता होती. इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या महाराणी ठरल्या. महाराणी एलिझाबेथ यांनी ७० वर्षे ब्रिटनवर सत्ता केली.

Queen Elizabeth
Queen Elizabeth II : राणी एलिझाबेथ यांनी घेतली चिरविश्रांती

दुसऱ्या महायुद्धात महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी सार्वजनिक सेवांमध्ये भाग घेतला. त्यांनी विविध युद्धांमध्ये राज्याचे नेतृत्व केले. १९४७ मध्ये त्यांनी प्रिन्स फिलिपशी लग्न केले. त्यांना चार्ल्स, ऍनी, प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड ही चार मुले झाली. एलिझाबेथ यांच्या राजवटीत युनायटेड किंगडममध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडले. ब्रिटिश वसाहतवादापासून आफ्रिकेचे स्वातंत्र्य, स्कॉटलंड, इंग्लंड आणि आयर्लंडच्या संसदांमध्ये विभाजन आदी बदल त्यांच्या कारकिर्दीत झाले.

 ९६ वर्षीय एलिझाबेथ या सध्याच्या जगातील सर्वात वृद्ध शासक देखील होत्या. त्यांच्या आधी हा विक्रम राणी व्हिक्टोरियाच्या नावावर होता, ज्यांनी १८६७ ते १९०१ पर्यंत सुमारे ६४ वर्षे राज्य केलं होतं.

Queen Elizabeth
Navratri Recipe: उपवासाला करा टेस्टी दही साबुदाणा

राणी एलिझाबेथ यांचा उत्तराधिकारी त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स आता बिटनचे महाराजा आहे. चार्ल्स ७३ वर्षांचे आहेत. चार्ल्स यांचा जन्म एलिझाबेथ यांनी सिंहासनावर बसण्याच्या अवघ्या ३ वर्षांपूर्वी झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com