Navratri: फक्त २० वर्ष राज्य करणाऱ्या क्लिओपात्राची आजही जगावर भूरळ

क्लिओपात्राने फक्त वीस वर्ष राज्य केले पण हे वीस वर्ष आजही लोकांच्या मनात अजरामर आहे.
Cleopatra
Cleopatrasakal

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या काही ठराविका महिलांविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. इजिप्तच्या टॉलेमिक राज्याची राणी आणि इजिप्तची शेवटची राणी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या क्लिओपात्रा बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. क्लिओपात्रा ही टॉलेमी सॉटर पहिला आणि अलेक्झांडर द ग्रेट यांची वंशज होती.

 हा टॉलेमीचा कालखंड म्हणून ओळखला जायचा. इसपू ३२३ मध्ये अलेक्झांडरचा मृत्यू झाला आणि ३०५ मध्ये अलेक्झांडरचा जवळचा मित्र असलेल्या जनरल टॉलेमीने स्वत:ला इजिप्तचा फॅरो घोषित केलं आणि टॉलेमीची राजवट सुरु झाली. या कालखंडात विशेष चर्चेत आली ती म्हणजे क्लिओपात्रा. क्लिओपात्राने फक्त वीस वर्ष राज्य केले पण हे वीस वर्ष आजही लोकांच्या मनात अजरामर आहे. आज आपण तिच्याविषयी जाणून घेऊया.

Cleopatra
Navratri 2022 : शववाहीका चालवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारी दुर्गा प्रिया पाटील

क्लिओपात्रा ही टॉलेमीच्या वंशातील टॉलेमी सातवा याची कन्या. याआधीही अनेक क्लिओपात्रा होऊन गेल्या पण ही सातवी क्लिओपात्रा तिच्या सौंदर्यामुळे, धाडसी वृत्तीमुळे आणि राजकीय वर्चस्वासाठी तिने घेतलेल्या मेहनतीमुळे विशेष चर्चेत होती.

क्लिओपात्रा बद्दल बऱ्याच आख्यायिका बोलल्या जातात पण क्लिओपात्राचे राजकीय वर्चस्व तितकेच मजबूत होते, हे कोणी नाकारू शकत नाही.

Cleopatra
Navratri 2022 : सप्तश्रृंगी देवीला पाच वर्षांनंतर बोकडबळी; शासनाने बंदी उठवली!

क्लिओपात्रा जगातील त्यावेळी सर्वात श्रीमंत आणि सुंदर महिला होती. तिच्याकडे तीन खुप बलशाही पुरुष होते.  एक जूलियस सीजर, दुसरा मार्क एंथोनी आणि तिसरा ऑक्टेवियन जूलियस सीजर ने तीला मिस्रची रानी बनवण्यास मदत केली होती.

असं म्हणतात की क्लिओपात्राला पाच भाषेचं ज्ञान होतं. क्लिओपात्रा केवळ १७ वर्षाची होती जेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. एवढचं काय तर स्वत:च  शासन आणि  स्वत:च अस्तित्व वाचवण्यासाठी क्लिओपात्राला काय काय नाही करावे लागले, हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

Cleopatra
Navratri 2022: ब्रह्मदेवांनी कमलपुष्पांनी महापूजा केलेली पंचम दुर्गा कमलजा देवी

सीजरच्या हत्येनंतर रोमच्या सत्तेवर मार्क एंटनी बसला. त्याने क्लिओपात्रा ला भेटण्यास बोलावले. एंटनी क्लिओपात्राला पाहून तिच्या प्रेमात पडला. एंटनी आणि क्लिओपात्राला धडा शिकवण्यासाठी ओक्टेवियनने युद्ध केले. लढाई दरम्यान अशी अफवा होती की क्लिओपात्राने आत्महत्या केली. हे ऐकून एंटनीने तलवारने स्वत:वर वार करत स्वत: ला संपविले.

काही इतिहासकारांच्या मते क्लिओपात्राने स्वत:ला साप दंश करवून आत्महत्या केली पण याबाबतची पुष्टी आजपर्यंतच झालेली नाही. आजवर क्लिओपात्राच्या मृत्यूबाबत अनेक आख्यायिका बोलल्या जातात पण क्लिओपात्राचा मृत्यू इतिहासातील एक मोठं गुढ आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com