Navratri 2022 : शववाहीका चालवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारी दुर्गा प्रिया पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navratri festival

Navratri 2022 : शववाहीका चालवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारी दुर्गा प्रिया पाटील

हेही वाचा: Navratri: फक्त २० वर्ष राज्य करणाऱ्या क्लिओपात्राची आजही जगावर भूरळ

कोरोना डोक्यावर थयथयाट करत असताना आपली माणसं दुर जात होती. कोरोना झालाय म्हणल्यावर गल्लीतल्या श्वानाला जसे नेतात अगदी तसेच पॉझिटीव्ह लोकांना नेले जायचे. एका मध्यमवर्गीय घरात कोरोनाकालीन परिस्थितीत मुलांना बाहेर फिरण्यासाठी सुद्धा पाठवलं जात नव्हते. ति तिथं ही २० वर्षाची ही पोर इतिहास रचत होती. या काळात कोरोना योद्ध्यांनी अफाट मदत केली. यापैकीच एक असलेल्या प्रियाबद्दल आज जाणून घेऊयात.

मी प्रिया प्रकाश पाटील एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. कोल्हापुरातल्या जाधववाडी येथे राहते. मी विवेकानंद कॉलेजात BSC या विषयाचं शिक्षण घेत असून मी एक योगा प्रशिक्षकही आहे. कोरोना काळात मी ऍम्ब्युलन्स चालक म्हणून काम केले आहे. भवानी फाउंडेशनचे हर्शल सुर्वे यांच्या मार्गदर्शनातून मी या कामाला सुरूवात केली.

हेही वाचा: Shardiya Navratri 2022 : दैत्यांचा वध करण्यासाठी देवतांनी दिले देवीला शस्त्र; जाणून कोणी काय दिले

माझ्या वडिलांचे मित्र माझ्या खुप जवळचे होते. त्यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या जवळ सिपीआरमध्ये मी आणि बाबा थांबलो होतो. पण शव वहन व्हायला जवळ जवळ 15 तास लागले. कारण, कर्मचारी यांचा तुटवडा होता. तिथे उभं असतानाच ठरवलं की माणूस मेल्यावरही त्याचे हाल संपत नाहीयेत. त्यामुळं आपण ऍम्ब्युलन्स ड्राइवर व्हायचं. माझं लायसन्स आहे त्यामुळं मी संधीच सोन करण्याचं ठरवलं. मी सीपीआर हॉस्पिटलमध्ये ही विचारलं आणि फायर स्टेशनलाही. एकेदिवशी फायर स्टेशनमधून फोन आला की, भवानी फौंडेशनचे हर्षल सुर्वे यांनी व्हॅन दिली आहे तिथे ते स्वतः काम करणार आहेत. त्यामुळं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या कामात जायचं ठरवलं.

पहिल्यांदा अगदी धाडसाने गेले. मला वाटलं होतं की मी फक्त ऍम्ब्युलन्स चालवणार आहे. माझा आणि डेडबॉडीचा काही संबंध येणार नाही. पण, जेव्हा समोर बॉडी पहिली आणि हर्षल दादा म्हणाले की, प्रिया मी मागून पकडतो तू बॉडी उचल. तेव्हा माझी प्रतिक्रिया होती की, काय मी उचलू, मला भीती वाटते. पण हर्षल दादांनी समजावलं. कोरोनाबाधित व्यक्ती मेल्यावर त्याच्या शरीरातून कसलेही इन्फेक्शन होत नाही. त्यामुळे बिनधास्त उचल बॉडी. दादांच हे वाक्य ऐकून धीर आला आणि मी कामाला लागले. पहिलीच दिवशी मी 11 बॉडी पोहोचवल्या आणि तिथ त्यांच्यवर अंत्यसंस्कारही केले.

हेही वाचा: Navratri 2022 : सप्तश्रृंगी देवीला पाच वर्षांनंतर बोकडबळी; शासनाने बंदी उठवली!

एके दिवशी तर चक्क आम्ही 24 बॉडी पोहोचवल्या आणि त्यावर अंत्यसंस्कार केले. काम संपवून घरी यायला मला 12 वाजयचे. घरी आले की आई बाबांचा फक्त चेहरा पहायला मिळायचा. 4 महिन्याच्या काळात मी कधीच त्या दोघांच्या जवळ गेले नाही. कामावरून आल्यावर आधी अंघोळ आणि मग सेपरेट रूममध्ये वाफ घेणे त्यानंतरच बाहेर पडणे. तेही 4 हात लांबूनच बोलणं व्हायचं. माझ्यासाठी 2 डबे केले होते. मी एक घेऊन जायची आणि दुसरा माझं मीच स्वच्छ करून बाहेर ठेवायचे. तो डबा आई 2 दिवस उलटल्यावरच सॅनिटाईज करून भरून ठेवायची. पण अशानेही खचून गेले नाही. उलट आई बाबा इतकं समजून घेऊन सपोर्ट करत आहेत, हे पाहून त्यांचं कौतुक वाटत.

कोरोना रुग्ण दगावल्यानंतर प्रशासनाकडून मृतदेहाला अतिशय काळजीपूर्वकरीत्या पॅक केलं जात. काही केमिकल मृतदेहावर मारले जातात. जेणेकरुन विषाणूंचा फैलाव होणार नाही. साधारण अंत्यविधी हा मृत्यूनंतर दोन तासात करावा लागतो. हा विधी करण्यासाठी आम्ही पीपीई किट घालून अंत्यविधी करत होतो. दुपारी जेवण आणि पुन्हा रात्री उशीरापर्यंत असा माझा दिनक्रम होता. माझ्यासोबत भवानी फाउंडेशनचे हर्षल सुर्वे, राकेश सावंत, चैतन्य अणवेकर हे सहकारी होते.

हेही वाचा: Navratri 2022 : ‘कोल्हापूर टू नागालँड’ पर्यावरण आणि आदिवासींच्या विकासासाठी झटणारी दुर्गा डॉ.श्रुती कुलकर्णी

काम करत असताना रोज बॉडी उचलणं सवयीचं झालं होतं. पण एकेदिवशी, एक गर्भवती महिला जिचे दिवस भरले होते. 2 दिवसांनी तिची डिलिव्हरी होणार होती. पण, अचानक ती कोरोना पॉझिटिव्ह आली आणि ते इतक्या प्रमाणात वाढलं की ती त्यातून कव्हर होऊ शकली नाही. जेव्हा तिची बॉडी समोर आली तेव्हा ती सीपीआरमधून स्मशानभूमीत नेऊ पर्यँत माझे अश्रू थांबले नव्हते.

कोरोना मृत्यू झालेले लोक माझे कोणीच नव्हते. पण, माणुसकी हा एकच धर्म मानून मी काम करत होते. पण अंत्यसंस्कार करणाऱ्या प्रत्येकाची मी ताई, बहीण, मुलगी झाले. मी ऍम्ब्युलन्स चालवते, यावर अनेक लोकांनी निगेटिव्ह कमेंट पण केल्या. तुम्हाला पैसे कमी पडलेत का? म्हणूज लेकीला अशा कामाला लावलं आहे. असे फोन आईबाबांना यायचे. पण मुळात बाबांना समाजसेवेची आवड आहे. त्यामुळं त्यांनी मला थांबवलं नाही.

हेही वाचा: Navratri: फक्त २० वर्ष राज्य करणाऱ्या क्लिओपात्राची आजही जगावर भूरळ

यावर्षी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल. त्यांनतर मी सामाजिक कार्यात सक्रिय होईन. सध्या कॉलेज आणि अभ्यास यामूळे माझ्यावर बंधन येतात पण कॉलेज संपलं की मी मदतीसाठी तत्पर असेन. आपला जन्म आणि मृत्यू यातील अंतर केवळ असच रडत खडत जगायचं की समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत संधीच सोन करायचं हे आपल्यावर असत. माझ्या आयुष्याची आता सुरुवात झाली आहे. मी आता खूप पुढचा विचार करतेय.