युवकांनी घेतला पर्यावरण संरक्षणाचा वसा

अर्चना बनगे
Monday, 7 October 2019

कोल्हापूर - पर्यावरणपूरक दसरा साजरा करण्यासाठी कोल्हापुरातील युवकानी प्रयत्न सुरू केला आहे.आपट्यांच्या झाडाच्या पानाच्या ऐवजी दसऱ्याला कृत्रिम पानांचा वापर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालया मध्ये गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे.

कोल्हापूर - पर्यावरणपूरक दसरा साजरा करण्यासाठी कोल्हापुरातील युवकानी प्रयत्न सुरू केला आहे.आपट्यांच्या झाडाच्या पानाच्या ऐवजी दसऱ्याला कृत्रिम पानांचा वापर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालया मध्ये गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे.

दसऱ्याच्या सणाला आपट्यांच्या पानांचा मान असतो ."सोनं घ्या सोन्यासारखं रहा" असे म्हणत नाते दृढ करण्याचा हा महत्वाचा सण. मात्र या सणातच आपट्याच्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होत असते. ही तोड रोखली जावी निसर्गाचे संवर्धन आणि जतन व्हावे यासाठी शहाजी कॉलेज आता एक पाऊल पुढे आले आहे.

पान हे वनस्पती सर्वात महत्त्वाचे अंग आहे. पानाद्वारे वनस्पती प्रकाश संश्लेषण, बाष्पीभवन यासारख्या जीवनावश्यक गोष्टी करत असतात. पाने नसतील तर ते झाड मरून जाईल .यासाठी पान आणि त्याचबरोबर झाड वाचले आणि जगले पाहिजे. यासाठी आता तरुण मुले पुढे आली आहेत.

शहाजी कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्र  विभागांमध्ये पर्यावरण पूरक दसरा साजरा करण्यासाठी रद्दी पेपर, व्येस्ट कागद, लग्नपत्रिकापासून आपट्याच्या पानांच्या आकाराची पाने तयार केली जातात.लेक वाचवा देश वाचवा ,प्लास्टिक बंदी, सेव वॉटर, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, सोनं घ्या सोन्यासारखं रहा. असे संदेश लिहून  समाजामध्ये प्रबोधन केले जाते . ही पाणे दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देऊन नातं दृढ करण्याचा प्रयत्न युवक-युवती करत आहेत आहेत.

गेल्या तीन वर्षापासून या महाविद्यालयात पर्यावरण पूरक दसरा आम्ही साजरा करत आहोत, या उपक्रमाला आता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे
-  डॉ .मकरंद ऐतवडे,

प्राध्यापक, वनस्पती शास्त्र विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijayadashami Festival special story