अन् मायालेकींची भेट ठरली अखरेची....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

संध्याकाळी जेवण करून सर्वजण पुण्यातून बाहेर पडले. अन्

नागाव (कोल्हापूर) : उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टर-ट्रॉलीवर मागून आलेली मोटार आदळून महिला जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. सविता शांतिनाथ बेडकिहाळे (वय 52, भोज, ता. चिकोडी) असे मृत महिलेचे नाव आहे. वैभव अनंत बडबडे (अकिवाट, ता. शिरोळ), सुनीता शीतल शिरहट्टी (तळदंगे, ता. हातकणंगले), संगीता संजय शिरगावे (इचलकरंजी) व पद्मजा अनिल सौंदत्ती (भोज, ता. चिकोडी) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे अडीचच्या सुमारास शिरोली फाटा येथे अपघात झाला.

हेही वाचा- पोलिसांनी लढविली नामी शक्कल; डिस्कच्या क्रमांकावरून आरोपी जाळ्यात

याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : अपघातातील जखमी सुनीता शिरहट्टी यांची मुलगी श्वेता ही पुणे येथे शिक्षणासाठी आहे. तिला भेटण्यासाठी सुनीता शिरहट्टी व त्यांच्या तीन बहिणी आणि बहिणीचा मुलगा वैभव बडबडे असे पाचजण मोटार (एमएच 09 डीएक्‍स 7794) मधून काल पहाटे पुण्याला गेल्या होत्या. संध्याकाळी जेवण करून सर्वजण पुण्यातून बाहेर पडले. पहाटे अडीचच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावरील पुलाची शिरोली येथील पार्श्वनाथ स्टीलसमोर चालक वैभव बडबडे याचा मोटारीवरील ताबा सुटल्याने उसाने भरलेल्या ट्रॉलीवर मोटार आदळली.

हेही वाचा- महाविद्यालयीन तरुणीचे मुरगुडात भरदिवसा अपहरण

यामध्ये सुनीता बेडकिहाळे यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तीन बहिणी व वैभव असे चौघे गंभीर जखमी झाले.बेजबाबदारपणे मोटर चालवून उसाच्या ट्रॉली मागून धडकल्याने चालकाविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident in shiroli kolhapur Marathi News