जोतिबा डोंगरावर कार्तिक पौर्णिमेसाठी एक लाख भाविक

निवास मोटे
Sunday, 29 November 2020


 
दर्शन घेतले मात्र दहा हजार भाविकांनी ..

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर ता. पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनसाठी महाराष्ट्र , कर्नाटक या राज्यातून सुमारे एक लाख भाविकांनी डोंगरावर गर्दी केली. त्यामुळे डोंगरावर मिनी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. आज पौर्णिमा असल्याने पहाटेपासून डोंगरावर भाविक येण्यास सुरुवात झाली . चांगभलच्या जयघोषाने डोंगर दणाणून गेला .

सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ४ ते सांयकाळी ७ या वेळेतच मुख्य मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले. कामधेनू गाय जवळ असणाऱ्या दरवाजातून भाविकांना सोडण्यात येत होते व दक्षिण दरवाजातून बाहेर येण्याचा मार्ग होता. त्यामुळे  मोठी गर्दी असल्यामुळे रांगेतून भाविकांनी दर्शन घेतले पण अन्य भाविकांना मात्र  कळस व मुख दर्शनावरच समाधान मानावे लागले. नियम व अटीनूसार केवळ दहा हजार भाविकांना दर्शनाचा लाभ झाला . देवस्थान समितीने परिसरात एलइडी व्दारे मुख दर्शनाची सोय केली होती.

 भाविक मुख्य मंदिरात जाताना मास्क  व  सॅनी टायझर लावून जात होते पण मंदिराच्या बाहेर मात्र सोशल ड्रिस्टन्सचा फज्जा उडालेला दिसत होता. तब्बल सात महिन्यानंतर डोंगर आज गर्दीने फुलून गेला. दिवसभर भाविकांच्या झुंडी येत राहील्या. मंदीरात आज सकाळी पाद्य पूजा , काकड आरती ,मुख मार्जन या विधीनंतर मंगलपाठ झाले . अभिषेकावेळी केदार स्त्रोत, केदार कवच यांचे पठण झाले. त्यानंतर सकाळी जोतिबा देवाची सांलकृत महापूजा बांधण्यात आली .रात्री साडे आठला भव्य पालखी सोहळा होईल . तसेच शिखरे प्रज्वलीत करण्याचा कार्यक्रम होईल .

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न -

कार्तिक पौर्णिमा महत्व 

जोतिबा डोंगरावर कार्तिक पौर्णिमेस पहिल्यापासून पारंपारीक महत्व असून येथून पुढे होणाऱ्या पाच पौर्णिमा महत्व पूर्ण मानल्या जातात. येणारे भाविक या पौर्णिमस नवस बोलतात .पाचव्या पौर्णिमेस जोतिबा देवाची चैत्र यात्रा असते .

मंदिर उघडल्यानंतरचा 
 आजचा दुसरा रविवार मुळे लाखाच्या आस पास भाविक दर्शनाच्या ओढीने डोंगरावर आले . पण नियम व अटी नुसार दहा हजार भाविकांनाच दर्शन घेता आले . इतर भाविकांनी मात्र मुख दर्शन कळस दर्शन घेतले.

महादेव दिंडे,अधिक्षक पश्चीम महाराष्ट्र देवस्थान समिती जोतिबा डोंगर

संपादन- अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 lakh people visit on jyotiba temple kolhapur