ब्रेकिंग - कोल्हापूरात आणखी 10  कोरोना रुग्णांचा समावेश....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जुलै 2020

सायंकाळी 10  कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे

कोल्हापूर : जिल्ह्यात आज सकाळपासून दुपारपर्यंत एकही नवीन कोरोना रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र, दुपारी तीननंतर तब्बल 16 तर सायंकाळी 10  कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  या 26 नव्या रूग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 1351 झाली आहे. 

दुपारी आलेल्या अहवालानुसार, कोल्हापूर शहरामध्ये रमण मळा - 1, टेंबलाईवाडी-2, इतर -1 असे चार रुग्ण आढळले आहेत. तर, हातकणंगले तालुक्‍यात 11 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामध्ये, हातकणंगले-1, इचलकरंजी-7, गणेशनगर, इचलकरंजी-3 तर, करवीर तालुक्‍यामध्ये गांधीनगर येथे 1 रुग्ण सापडला आहे. जिल्ह्यातील कोरोना समुह संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा- हातकणंगलेत पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांच्यांत चांगलीच जुंपली..का वाचा -

दरम्यान इचलकरंजी येथे एकाच घरातील 9 जण आढळल्या मुळे खळबळ माजली आहे तर सायझिँग व्यवसायातील शहरातील एका उद्योजकांस कोरोना लागण झाली आहे

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 more corona patient found in kolhapur