Coronavirus : दुबईतून कोल्हापुरात आले ११५ प्रवासी... 

115 travelers arrived in Kolhapur from Dubai kolhapur marathi news
115 travelers arrived in Kolhapur from Dubai kolhapur marathi news
Updated on

कोल्हापूर : राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यापासून २६५ नागरिक विविध ३० देशांतून कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाले असून यापैकी सर्वाधिक ११५ पर्यटक हे दुबईतून कोल्हापुरात आले आहेत. परदेशातून जिल्ह्यात आलेल्या एकूण पर्यटकांपैकी १३३ पर्यटक हे ग्रामीण भागातील तर १३२ पर्यटक हे शहरी भागातील आहेत. 

सौदी अरेबिया, अमेरिकेतून आलेल्यांची संख्याही मोठी
फेब्रुवारीच्या सुरवातीला किंवा महिनाअखेरीस परदेशी गेलेले अनेक भारतीय नागरिक विविध देशांतून अडकून पडले होते. चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीय नागरीकांनीही मग आपल्या देशाची वाट धरली; पण यापैकी बहुंताशी पर्यटक हे विविध कारणांनी गेलेल्या देशातच अडकून पडले. त्यात तेहरानमध्ये कोल्हापूरच्या ४४ पर्यटकांचा समावेश होता. या प्रवाशांसह इतर प्रवाशांना भारतात आणण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यापासून राज्यातील सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यातील २६५ परदेशात गेलेले पर्यटक कोल्हापुरात टप्प्याटप्प्याने दाखल झाले. या सर्व पर्यटकांची वैद्यकीय चाचणी सीपीआरमध्ये व त्याचबरोबर मुंबई, पुणे येथील विमानतळावरही करण्यात आली. 

चीनमधून आलेत पाच पर्यटक
कोल्हापुरात परदेशातून दाखल झालेले पर्यटक हे जवळपास ३० देशातून आलेले आहेत. यात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या चीनमधून आलेल्या पाच पर्यटकांचा समावेश आहे, या पाचपैकी १ जण ग्रामीण भागातील आहे. चीनशिवाय थायलंड, इराण, इटली, मलेशिया, ओमान, जॉर्जिया, बांग्लादेश, लंडन, पाकिस्तान, नेपाळ, स्पेन, वेस्ट इंडिज, फ्रान्स आदि देशातून आलेल्या पर्यटकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com