12 mountain complete in five day kolhapur mountaineers in kolhapur
12 mountain complete in five day kolhapur mountaineers in kolhapur

कोल्हापूरच्या अमोलचा नाद करायचा नाय, एकाच मोहिमेत बारा सुळक्यांवर चढाई

कोल्हापूर : कोल्हापूरचा गिर्यारोहक अमोल अशोक आळवेकर यांनी एकाच मोहिमेत बारा सुळक्यांवर यशस्वी चढाई करण्याचा अनोखा उपक्रम नुकताच केला. पाच दिवसांच्या एकाच मोहिमेत त्यांनी ही चढाई केली. ते संभाजीनगर आगार येथे वाहक म्हणून कार्यरत आहेत. सह्याद्री रांगेतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यात खोडकोना-मेंढवण परिसरात सुळक्यांचा समूह आहे.

खोडकोना-मेंढवण सुळके समूह अशेरी गडासमोर व अडसूळ सुळक्यांमध्ये आहे. या सर्व सुळक्यांच्या एका बाजूला खोडकोना, तर दुसऱ्या बाजूला मेंढवण आहे. त्यामुळे या सुळक्यांना खोडकोना-मेंढवण सुळके समूह असे नामकरण करण्यात आले आहे. या समूहात एकूण नऊ सुळके असून, पैकी पाच सुळके खोडकाना गावाकडील बाजूस तर चार सुळके मेंढवणच्या बाजूस आहेत. त्यांची आरोहण याची उंची सर्वसाधारण ते दीडशे फूट आहे. या समूहाजवळ अडसूळ सुळका आहे. त्याची उंची सुमारे शंभर फूट इतकी आहे. अडसूळ शेजारी बावाचाढुक सुळका आहे. त्याची उंची शंभर फूट आहे. खोडकाना गावापासून तीस किलोमीटर अंतरावर महालक्ष्मी सुळका असून, त्याची उंची १२० फूट आहे. 

अमोलसह त्याचे सहकारी अरविंद नवले व मंगेश कोयंडे यांनी या सुळक्यांवर चढाई करताना क्लायबिंगमधील क्रॅक क्लायंबिंग, ट्रिव्हायसिंग, ओवरहॅंग, अशीवल, चिमणी क्लायबिंग टेक्निकचा वापर केला. सर्व सुळक्यावर स्क्रीचा (घसरणीचा) भाग जास्त असल्याने अत्यंत सावधगिरीने आरोहण केले. सर्व चढाईवेळी गिर्यारोहणाचे साधन म्हणून डायनॅमिक क्लायंबिंग रोप, टेप सिलींग, डायनामा, रॉकपिटॉन, लोखंडी पेग, क्वीक ड्रॉ, कॅरॅबीनर, डिसेंडर, हॅमर, हेल्मेट, क्लायबिंग शूज साधनांचा वापर केला. 

सुळक्यांच्या आरोहनावेळी बेसकॅम्प अडसूळ सुळका खोडकोना समूह सुळके यांच्यामधील खिंडीत करावा लावावा लागला. तेथून जंगलात पाणवठा दीड, तर  सुळक्यांपर्यंत पोचण्याचा मार्ग दोन तासांचा होता. पाच दिवसांच्या मोहिमेत सकाळी सहा ते सायंकाळी सातपर्यंत सुळके चढाई सुरू होती. सुळके चढाई झाल्यानंतर परत बेस कॅम्पला येऊन जंगलातून ट्रॅक करत पाणवठ्यावर पाणी आणावे लागत होते. त्यानंतर जेवण केले जात होते, अशी माहिती आळवेकर यांनी दिली.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com