सोशल मीडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी ऍडमिनसह 18 जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

खोटी माहिती, अफवा व धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश पाठवून समाजात गैरसमज व भीती पसरविणाऱ्या जिल्ह्यातील 18 जणांवर जिल्हा पोलिस दलाने गुन्हे दाखल केले. यात काही ग्रुपच्या ऍडमिनचाही समावेश आहे. 

कोल्हापूर - सोशल मीडियावर खोटी माहिती, अफवा व धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश पाठवून समाजात गैरसमज व भीती पसरविणाऱ्या जिल्ह्यातील 18 जणांवर जिल्हा पोलिस दलाने गुन्हे दाखल केले. यात काही ग्रुपच्या ऍडमिनचाही समावेश आहे. 

गेल्या तीन दिवसांत अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार आज दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तपशील असा ः करवीर पोलिस ठाणे- विनायक अमृत आरेकर (पाचगाव), आमीर मुजावर (विक्रमनगर). मुरगूड पोलिस ठाणे- क्रांती तरुण मंडळ व्हॉट्‌सऍप ग्रुपचा सदस्य संदीप मेठे (मुरगूड). इस्पुर्ली पोलिस ठाणे- अमृत बाबूराव जाधव (खेबवडे, ता. करवीर). शिवाजीनगर पोलिस ठाणे- श्री होलसेले व्हॉट्‌सऍप ग्रुपचा सदस्य वैभव मुकुंद कदम (तांबेमळा, इचलकरंजी). फेसबुकवर जातीय तेढ निर्माण करणारा संदेश प्रसारित केल्याबद्दल अभय मेटा (इचलकरंजी). हातकणंगले पोलिस ठाणे- संजय नानगरे (दानेवाडी, ता. पन्हाळा). वडगाव पोलिस- स्थानिक ग्रुप श्री तानाजीराव पाटील युवा मंचाचा सदस्य युवराज केरबा पाटील (ठिकपुर्ली, ता. राधानगरी), तानाजी नारायण पाटील (भादोले, ता. हातकणंले). पेठवडगावमधील दिल दोस्ती दुनियादारी या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर संदेश पाठविल्याबद्दल योगेश चंद्रकांत रावळ (पेठवडगाव), अमोल रामचंद्र काळे (पेठवडगाव). कष्टाची भाकर व्हॉट्‌सऍप ग्रुपचा सदस्य गणेश बाळासाहेब लगड (विक्रमनगर, कोल्हापूर) व भूषण गंगाराम सालकर (पेठवडगाव). गांधीनगर पोलिस ठाणे- समीर सिकंदर नदाफ (वळीवडे, ता. करवीर). चंदगड पोलिस ठाणे- तालुक्‍यातील एस. के. ग्रुपचे सदस्य सुनील विश्वनाथ काटकर (चंदगड). गडहिंग्लज पोलिस ठाणे- फिरोज मुस्ताक नाईकवडे, मुस्तफा नाईकवडे, प्रवीण बाबूराव चौगुले (भडगाव, ता. गडहिंग्लज) अशा संशयितांवर गुन्हे दाखल झाले. 

हे पण वाचा - नजर जाईल तिथपर्यंत मृत्यूचा खच ; खांदा द्यायलाही नव्हती माणसे 

आजऱ्यातील युवकावर गुन्हा 
आजरा ः आक्षेपार्ह मजकूर पसरवून जातीय तेढ निर्माण होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी येथील रूपेश परीट याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी जुबेर माणगावकर यांनी फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक शेळके तपास करीत आहेत. 

हे पण वाचा -  रस्ता चुकला अन बस पोहोचली...! ; लोक बुचकळ्यात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 people charged with admin for allegedly spreading social media rumors