मुलींची प्रगती ही सामाजिक जबाबदारी ;  देशाच्या प्रगती, विकासात महत्त्वपूर्ण योगदान

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

डॉ. विभूती पटेल; शिवाजी विद्यापीठात २ दिवसीय राष्ट्रीय वेबिनार
 

कोल्हापूर :  मुलींचे संगोपन आणि कौशल्यवर्धक प्रगती ही सामाजिक जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मत मुंबई येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. विभूती पटेल यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानांतर्गत समाजशास्त्र अधिविभाग, विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘गर्ल चाईल्ड इन इंडिया - इश्‍यूज अँड प्रॉस्पेक्‍ट्‌स’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय वेबिनार झाला. यावेळी ते बोलत होते.  विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव प्रमुख उपस्थित होते.

डॉ. पटेल म्हणाले, ‘आज मुली सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत.  देशाच्या प्रगती, विकासात मुलींचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.  परंतु, आजही काही ठिकाणी त्यांना भेदभावासह योग्य सामाजिक दर्जा प्राप्त करण्यासाठी झगडावे लागत आहे.  हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे.  भारत सरकारच्या विविध योजनांमुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्याबरोबरच अनेक विविध क्षेत्रांची कवाडे खुली झाली आहेत.

हेही वाचा- महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज राहा -

’  प्रा.श्रुती तांबे (पुणे), मेधावीनी नामजोशी (मुंबई), जयश्री वेलणकर (नवी दिल्ली) यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या डॉ. आसावरी जाधव यांनी केले. बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन इंग्रजी अधिविभागातील स्नेहल पाटील यांनी केले.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 day National Webinar at Shivaji University