अबब : 25 लाख मिटर कापड लागलय कुजायला....

25 lakh m wet cotton cloth on the way to rottenness in process kolhapur marathi news
25 lakh m wet cotton cloth on the way to rottenness in process kolhapur marathi news

इचलकरंजी (कोल्हापूर) : कोरोनामुळे देशात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन स्थिती असल्याने याचा मोठा फटका वस्त्रनगरीला बसला आहे. शहरातील तब्बल 21 प्रोसेस मधील 25 लाख मीटर ओले सुती कापड कुजण्याच्या मार्गावर आहेत. यातून प्रोसेसधारकांना चार कोटी पर्यंत नुकसान भोगावे लागणार आहे.अशा परिस्थितीत ओले सुती कापडाचा माल सुकविण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या साथीचा फैलाव समूहपातळीवर रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी घरीच बसावे यासाठी जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. पण यानंतर नागरिकांनी बेजबाबदारपणा दाखविल्यानंतर सरकारने नाईलाजास्त लॉकडाउन जाहीर केले आणि सर्व उद्योगधंदे जागी ठप्प झाले. पण याचा मोठा फटका वस्त्रनगरीला बसला.

25 लाख मीटर ओले सुती कापड कुजण्याच्या मार्गावर

शहरातील हॅन्ड प्रोसेस मधून प्रक्रिया केले जाणारे सुमारे 25 लाख मीटर सुती कापड आहे त्या अवस्थेत पडून राहिले. या ओल्या कापडावर जर वेळीच वाळविण्याची  प्रक्रिया केली नाही तर हे कापड कुजून जाईल, अशी अवस्था आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शासनाने उद्योगधंदे सुरू करण्यास अटकाव केल्याने प्रोसेस धारकांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.

वाळविण्याची प्रक्रिया थांबली अन्
इचलकरंजीत लाखो मीटर कापड नेहमी तयार होत असते.यंत्रमागावर सुतापासून कापड तयार झाल्यावर प्रोसेसमध्ये यावर विविध प्रक्रिया केल्या जातात आणि कापडाला परिपूर्ण दर्जा दिला जातो. प्रोसेसमध्ये तयार झालेल्या कापडाचे सोडियम क्लोराइड द्वारे ब्लिचिंग केले जाते. त्यानंतर कापड वाळवणे अत्यंत महत्त्वाचे असते. पण लॉकडाउनमुळे कारखाने, प्रोसेस पूर्णपणे बंद असल्याने वाळविण्याची प्रक्रिया थांबली. त्यामुळे सुमारे 25 लाख मीटर कापड बुरशी येऊन कुजण्याच्या मार्गावर आहे.

ओल्या कापडाला आली बुरशी
आधीच वीजदर सवलत, कामगारांचा तुटवडा आणि प्रदूषणाच्या आरोपात अडकलेल्या  प्रोसेसधारकांसमोर सध्या ओल्या सुती कापडाचे नवे संकट निर्माण झाले आहे. सध्या प्रोसेस बंद असूनही प्रतिदिन सीईपीटीला 600 ते 700 रुपये खर्च द्यावा  लागत आहे. दररोज जवळपास 50 हजार मीटर सुती कापड तयार करून चांगले उत्पन्न मिळत असे. पण लॉकडाउनमुळे धोती, बुट्टा साडी, उपरणे, साडी फॉल, फेटे, अस्तर कापड सर्व हे सर्व तयार होणे थांबले आहे. प्रोसेसमध्ये सध्या ओल्या कापडाला बुरशी येत असून माल कुजत आहे.

 हेही वाचा-पोलिसांना केली धक्काबुक्की अन् घडले असे.....

कापड वाळविण्यासाठी परवानगी मिळावी
शहरात यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणात असल्याने प्रोसेसची संख्या मोठी आहे.कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या स्थितीत 21 प्रोसेस मधील जवळपास पाच कोटी रुपये किमतीचे सुमारे 25 लाख मीटर ओले कापड पडून आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने आम्हाला कापड वाळवण्यासाठी परवानगी द्यावी, असे हँड प्रोसेसधारक मारुती पन्हाळकर यांनी सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com