कोल्हापुरातील 28 बंधारे पाण्याखाली; दोन वाहतूक मार्ग बंद

28 dams in Kolhapur under water
28 dams in Kolhapur under water

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून ल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फुटांवर गेली आहे. 

धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असून  राधानगरी धरणातून 1200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग 1 व प्रमुख जिल्हा मार्ग 1 असे 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 110.99 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1100 तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड, वारणा नदीवरील चिंचोली, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे आणि  खडक कोगे, वेदगंगा नदीवरील मसवे, शेळोली, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, निलजी व ऐनापूर, घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर भोगोली, हिंडगाव व कानडेसावर्डे असे एकूण 28 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 37.28 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 76.252 इतका पाणीसाठा आहे.
 

अशी आहे बंधाऱ्यांची पाणी पातळी 
राजाराम 21.5 फूट, सुर्वे 22 फूट, रुई 50.9 फूट, इचलकरंजी 48 फूट, तेरवाड 42 फूट, शिरोळ 33.6 फूट, नृसिंहवाडी 29 फूट, राजापूर 18.6 फूट तर नजीकच्या सांगली 9 फूट व अंकली 10.10 फूट अशी आहे. 


 

दोन वाहतूक मार्ग बंद

पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग 1 व प्रमुख जिल्हा मार्ग 1 असे 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

 करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर राष्ट्रीय महामार्ग-194 वरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. 
आजरा तालुक्यातील प्रजिमा 52 पासून नवले देवकांडगाव, कोरिवडे, पेरणोली, साळगाव राम क्र. 188 ला मिळणारा प्रजिमा साळगाव बंधाऱ्यावर अर्धा फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून इजिमा 132 सोहाळे मार्गे वाहतुक सुरू आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com