कोल्हापुरात मास्क न वापरणाऱ्यांना महापालिका प्रशासनाचा दणका  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या विरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. 

कोल्हापूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क नो एन्ट्रीची मोहिम महापालिका प्रशासनाने गतिमान केली असून कोल्हापूर शहरात विना मास्क, सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम कडक केली असून गेल्या आठवड्यात महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून 30 लाख 71 हजाराचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. 

यामध्ये 21 सप्टेंबर 2020 ते आज अखेर सात दिवसामध्ये हा दंड करण्यात आला असून यापुढेही ही मोहिम अधिक तिव्र करण्याचे आदेश प्रशासकिय यंत्रणेला दिल्याचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, कोल्हापूर शहरात विना मास्क फिरणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न घालणा-या दुकानदार, व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येत असून रस्त्यावर विशेषता सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या विरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. 

21 सप्टेंबरपासून आज अखेर सात दिवसामध्ये वसूल केलेल्या 30 लाख 71 हजाराच्या दंडामध्ये 21 सप्टेंबरला 42800, 22 सप्टेंबरला 28800, 23 सप्टेंबर 53200, 24 सप्टेंबरला 47900,25 सप्टेंबरला40200, 26 सप्टेंबरला 39300, आणि 27 सप्टेंबरला 54900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

हे पण वाचा Kolhapur CPR Fire Update :  आगीत चार जणांचा मृत्यू  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरवासीयांनी तसेच व्यापारी, व्यावसायिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी केले आहे. 

हे पण वाचा ...अन्यथा सर्व तहसील कार्यालयांना टाळे ठोकू! सकल मराठा समाजाचा इशारा

 
 

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 lakh 71 thousand fine collected from those who do not use masks in kolhapur