Kolhapur CPR Fire Update : ट्रामा केअर सेंटरला आग : चार जणांचा मृत्यू

संदीप खांडेकर
Monday, 28 September 2020

सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या पंधरा कोरोना रुग्णांना तत्परतेने हलविण्यात आले. मात्र,

कोल्हापूर : सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरला पहाटे अचानक आग लागल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या पंधरा कोरोना रुग्णांना तत्परतेने हलविण्यात आले. मात्र, त्यानंतर व्हेंटिलेटर जोडेपर्यंत दोघांचा तर त्यानंतर अन्य दोघे, असा एकूण चौघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान, पोलिस यंत्रणा व  कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी

 जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे
सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये बाधितांवर उपचार सुरू आहेत. सेंटरमध्ये पंधरा रुग्ण उपचार घेत असून, आज पहाटे अचानक लागलेल्या आगीत साऱ्यांची धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी तेथील रुग्णांना हलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाचे जवान व पोलिस यंत्रणाही पोचली.

हेही वाचा- माझे कुटुंब’ मोहिमेपासून गावातील नेते चार हात लांबच -

अग्निशमन दलाच्या जवानांनी सात ते आठ रुग्णांना तेथून अन्य विभागात हलवले. या रुग्णांना सुरक्षितपणे हलवल्यानंतर व्हेंटिलेटर जोडेपर्यंत दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर अन्य दोघे दगावले गेले.ही घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांची भेट घेतली. त्यानंतर घडलेल्या प्रकरणाची चौकशी सुरु झाली.

 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: update case Fire in CPR covid hospital in kolhapur reason short circuit 4 patients die