कोल्हापूर जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायती बिनविरोध 

सुनील पाटील 
Tuesday, 5 January 2021

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघारीसाठीही एकच झुंबड उडाली होती. 

कोल्हापूर : जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी आज अर्ज माघारीच्या शेवटच्यादिवशी जिल्ह्यात 15 हजार 117 उमेदवारांपैकी 7 हजार 40 उमेवारांनी माघार घेतली. तर, 7 हजार 657 उमेवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सर्वाधिक शाहूवाडी तालुक्‍यातील 8 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघारीसाठीही एकच झुंबड उडाली होती. 

जिल्ह्यात 433 ग्रामपंचायतींमधील 1492 प्रभागामध्ये 4 हजार 27 सदस्यांसाठी 1 हजार 761 मतदान केंद्रावर 9 लाख 29 हजार 877 मतदान मतदान करतील. अर्ज माघारीच्या दिवशी जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर, 147 प्रभागातील 368 सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्‍यात 8, पन्हाळा 3, हातकणंगले 1, शिरोळ एकही नाही, करवीरमधील 5, गगनबावडा 6, राधानगरी 2, कागल 5, भुदरगड 4, आजरा 5, गडहिंग्लज 6, चंदगड 8 अशा 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

हे पण वाचा - Heritage of Kolhapur: मुस्लिम बोर्डिंग : कोल्हापूरचे शैक्षणिक वारसास्थळ  

 ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी सुट्टी जाहीर 
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गावातील सर्व दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना कामगारांना भरपगारी मतदानांच्या दिवशी शुक्रवार (ता. 15) पगारी सुट्टी द्यावी अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिल्या आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 47 gram panchayats in Kolhapur district unopposed