'त्या' कोरोना योद्‌ध्याच्या वारसांना सरकारकडून 50 लाख  

50 lakh to the heirs of a village development officer who died due to corona
50 lakh to the heirs of a village development officer who died due to corona

कोल्हापूर - कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसांना 50 लाख रुपयांची विमा कवच रक्कम आदा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

सुपा (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले ग्रामस्थांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांना संसर्ग झाला. 3 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसास विमा कवच रक्कम मिळण्याबाबत परभणी जिल्हा परिषदेने शासनास प्रस्ताव दिला होता. प्रस्तावास दिवसात मंजुरी देऊन मृत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वारसास 50 लाख रुपयांची विमा कवच रक्कम आदा करण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. 

ग्रामीण भागातील कर्मचारी जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावत आहेत. प्रसार रोखण्यासाठी गावपातळीवरिल कर्मचारी कोरोना योद्धा बनून काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर गावपातळीवर काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा, जिल्हा परिषद आस्थापनेवरील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगारांना सप्टेंबरपर्यंत 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुषंगाने परभणी जिल्ह्यातील संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वारसांना तातडीने विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. श्री. आम्ले यांच्या पत्नी श्रीमती रंजना यांना उद्या (ता. 15) पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या रकमेचा धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती श्री. मुश्रीफ यांनी दिली. 

हे पण वाचा - Video - ब्रेकिंग - महिलांनी फायनान्सच्या कर्मचाऱ्यांना काळं फासून काढली धिंड

सरकार पाठीशी 
कोणाचाही मृत्यू होणं दुर्दैवी आहे. ग्रामविकास विभागांतर्गत राज्यात या पहिल्या कोरोना योद्‌ध्याचा मृत्यू झाला आहे. अशा कोरोना योद्‌ध्यांच्या वारसांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार हिमालयासारखे उभे आहे. समाजानेही अशा कुटुंबीयांना मानसिक आधार द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

संपादन- धनाजी सुर्वे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com