ब्रेकिंग- कोल्हापुरात कोरोना सहाशे पार, आणखी १७ जण पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

या १७ रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता ६०७ वर पोहोचली आहे. 

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. काल दिवसभरात तब्बल ६८ रूग्णांची वाढ झाल्यानंतर आज दुपारी २८ रूग्णांची वाढ झाली होती. नुकत्याचा हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आणखी १७ रूग्णांचे अवहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या १७ रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता ६०७ वर पोहोचली आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, आज सकाळी सापलेल्या २८ रूग्णांपैकी 15 पुरूष,  13 महिला
 असून त्यातील 6 गडहिंग्लज, 10 कागल, पाच भुदरगड तर करवीर,  शाहूवाडीतील प्रत्येकी एक, आजरा दोन, उर्वरित शहरातील आहेत. 

कोरोना केअर सेंटरमध्ये ऑक्‍सिजनसुविधेचे 10 बेड 
जिल्ह्यातील प्रत्येक केव्हिड केअर सेंटरमध्ये ऑक्‍सिजन सुविधा असणारे 10 बेड तसेच कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्‍सिजन सुविधेसह 50 बेड आणि प्रत्येक सेंटरला 2 डिजिटल ईसीजी मशिन्स लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज बोलतांना सांगितले. कोरोना उपचारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी तसेच खाजगी तालुका समन्वयक यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीव्दारे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

हे पण वाचा -  ब्रेकिंग : कोल्हापुरला मान्सूनपूर्वचा जोरदार दणका ; झाड कोसळून पेपर विक्रेत्याचा मृत्यू

प्रत्येक कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये प्रत्येकी 2 डिजिटल ईसीजी मशिन्स आणि पल्स ऑक्‍सीमीटर उपलब्ध केले जाईल. जिल्हयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृत्यु दर कमी आहे, तो कमीच राहीला पाहिजे. आरोग्य अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हयात अद्याप सामुहिक संसर्ग झालेला नाही. यापुढेही रोखून ठेवण्याचे काम केले जाईल. कोरानामुळे मृत्युदरही वाढू नये. आरोग्य यंत्रणेस आवश्‍यक त्या सुविधा आणि साधने द्यावीत. कोरोना रुग्णांची काळजी घेतांना आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आपली स्वत:चीही काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले. 

हे पण वाचा - त्या चिमुरडीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली पण...

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 600 corona patient cross in kolhapur district