9वी ते 12 वी कोचिंग क्‍लासला परवानगी 

9th to 12th coaching classes allowed
9th to 12th coaching classes allowed

कोल्हापूर - जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी च्या कोचिंग क्‍लासेस सुरू करण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र क्‍लास सुरू करतानाची नियमावलीही त्यांनी जाहीर केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातील माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील अनेक व्यवसाय उद्योग बंद असल्याने आर्थिक अडचणीत आले. अनलॉक काळात बहुतांशी उद्योग सुरू झाले. पण खासगी कोचिंग क्‍लास बंद होते. त्यामुळे तेथील शिक्षक, संचालक यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. याची जाणिव ठेऊन जिल्ह्यातील 9वी ते 12 वी कोचिंग क्‍लासना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करू क्‍लास सुरू करावे लागणार आहेत. यासाठी स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

हे पण वाचाGram Panchayat Results : सफाई कामगार आजी झाल्या गावच्या कारभारी
 
हे आहेत नियम 
- केवळ 9 वी ते 12 वी हेच क्‍लास सुरू राहतील. प्रत्येक खुर्ची किंवा बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. दोन खुर्च्यांमध्ये एक खुर्ची रिकामी ठेवावी. 
- क्‍लासमधील सर्व कर्मचारी, शिक्षकांची कोव्हीड - 19 चाचणी करणे बंधनकारक आहे. 
- क्‍लासमध्ये येताना दरवाज्याजवळच विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग करणे बंधकारक आहे. 
- क्‍लासमध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक यांना मास्कचा वापर अनिवार्य आहे. 
- क्‍लासमध्ये आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्या प्रमाणे योग्य ते शारिरिक अंतर राखणे आवश्‍यक आहे. 
- ताप, सर्दी, खोकला असणारे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना प्रवेश देऊ नये. 
- क्‍लासमध्ये पुरेशा प्रमाणात सॅनॅटायझर ठेवणे आवश्‍यक आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com