जिल्हा परिषदेत महत्त्वाचे काम असणाऱ्या 112 लोकांना प्रवेश

Admission to 112 people in Zilla Parishad
Admission to 112 people in Zilla Parishad

कोल्हापूर : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा परिषदेने अभ्यागतांना प्रवेश बंद केला आहे. तरीही आज महत्त्वाचे काम असणाऱ्या 112 लोकांना प्रवेश दिला. इतरवेळी दररोज 600 ते एक हजार लोक येत होते. तसेच मुख्य प्रवेशद्वारावरच टपाल स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. सुमारे 10 ते 12 लोक या ठिकाणी नेमले आहेत. आज दिवसभरात 239 टपालांची गेटवरच नोंद केली. 

जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्याचा पती पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषद हादरली आहे. त्यामुळे आजपासून अभ्यागतांना जिल्हा परिषदेत प्रवेश बंदी केली. दिवसभरात कामाची निकड पाहून केवळ 112 अभ्यागतांनाच प्रवेश दिला. मात्र, या सर्व लोकांचे नाव, नंबर, पत्ता आदी माहिती घेतली आहे. तसेच या सर्व लोकांची आरोग्य तपासणीही केली. तालुक्‍यातून येणारे टपाल स्वीकारण्यासाठी प्रवेशद्वारातच 10 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडेच टपाल जमा करून कर्मचाऱ्यांना परत पाठवले जात आहे. 

सभा घेतली ऑनलाईन 
जिल्हा परिषदेत आज आरोग्य व वित्त समितीची मासिक सभा होती; मात्र ही सभा ऑनलाईन घेतली. दोन्ही समितीचे दोन, दोनच सदस्य उपस्थित होते. इतर सदस्य ऑनलाईन सहभागी झाले. पदाधिकारी वगळता सदस्य कोणी जिल्हा परिषदेकडे फिरकले नाहीत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com