आजऱ्याच्या रामतीर्थची यात्रा रद्द

Ajara-Ramtirtha Yatra Canceled Kolhapur Marathi News
Ajara-Ramtirtha Yatra Canceled Kolhapur Marathi News

आजरा : कोरोनाची पार्श्‍वभूमी लक्षात घेता "रामतीर्थ'ची यात्रा रद्द करण्याचा निर्णय आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत घेण्यात आला. उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी याबाबातची घोषणा केली. घरफाळा व अन्य करांची थकबाकी असलेल्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा सभेत देण्यात आला. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी अध्यक्षस्थानी होत्या. 

उपनगराध्यक्ष नाईक म्हणाले, ""कोरोनामुळे अनेक गावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी रामतीर्थ येथे महाशिवरात्रीला होणारी यात्रा देखील रद्द करण्यात येणार आहे.'' करवसुली अधिकारी विजयकुमार मुळीक यांनी करविभागाचा लेखा जोखा मांडला. आजरा शहरातील शासकीय कार्यालयाकडे 29 लाख 12 हजार 227 इतकी थकबाकी असल्याचे सांगितले.

वैयक्तीक थकबाकीदारांची यादीही मोठी आहे. थकबाकीदारांवर कारवाईसाठी प्रशासनाकडून मोहीम उघडली जाणार असून त्यांची नावे शहरातील चौका-चौकात डिजीटल फलकावर लावणार आहे. त्याचबरोबर जप्तीची कारवाई देखील केली जाईल. त्यामुळे थकबाकीदारांनी थकबाकी भरून नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

नगरसेविका शुभदा जोशी यांनी महिला बचत गटांचा प्रश्‍न उपस्थित केला. या गटाची नोंदणी नगरपंचायतीकडून होत नाही. त्यामुळे अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले. आजरा शहरात डेंगीचे रुग्ण आढळत असल्याची सभेत चर्चा झाली. मुख्याधिकारी अजिंक्‍य पाटील यांनी आरोग्य विभाग व नगरपंचायत यंत्रणा मोहीम राबवित असल्याचे सांगितले. नगरसेवक किरण कांबळे यांनी नगरपंचायतीच्या सेवेत कायम झालेल्या 14 कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. अन्य कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, याची मागणी केली.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी 5 कोटींचा निधी मंजूर केला असून वैशिष्ट्येपुर्ण कामे सुचवावीत, असे सांगितले. अस्मिता जाधव, संजीवनी सावंत, रेश्‍मा सोनेखान, अनिरुध्द केसरकर, शकुंतला सलामवाडे, सुमैय्या खेडेकर, सीमा पोवार यांनी चर्चत भाग घेतला. विविध विभागाचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते. 

करवसुलीवर चर्चा 
दरम्यान, करवसुली 90 टक्केपर्यंत झाली पाहिजेत अन्यथा निधी मिळण्यास अडचणी येतील, असे उपनगराध्यक्ष नाईक यांनी सांगितले. करवसुलीमधून शाळांना वगळावे, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी यांनी केली. कोरोनाच्या काळात लोकांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे घरफाळ्यावरील दंड वसुली करू नये, अशी मागणी नगरसेवक संभाजी पाटील यांनी केली. नगरसेवक आनंदा कुंभार, नाईक यांनी मुद्दा उचलून धरला. याबाबत ठराव घ्यावा, असा आग्रही धरण्यात आला. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com