‘चेतना अपंगमती’मधील ‘सीआयडी’ची चटका लावणारी एक्‍झिट..!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

मतिमंद मुलांच्या विश्‍वात ऋषी कपूर अशी ओळख

कोल्हापूर :  येथील चेतना अपंगमती विद्यालयातील विद्यार्थी अजिंक्‍य चौधरी (वय ३५) याने आयुष्याच्या रंगमंचावरून कायमची एक्‍झिट घेतली. शाळेत तो ‘सीआयडी’ या नावाने ओळखला जायचा, त्याची ऋषी कपूर अशी ओळख होती.
अजिंक्‍य राहायला सुभाषनगर परिसरात. सातव्या-आठव्या वर्षीच तो ‘चेतना’ शाळेत दाखल झाला. शाळेचे स्नेहसंमेलन असो किंवा क्रीडा सप्ताह, त्यात तो पहिल्यापासून अग्रेसर असायचा. 

‘सीआयडी’मधील ‘दया दरवाजा तोड दो’ हा त्याचा प्रचंड आवडीचा संवाद. त्यामुळे शहर परिसरात मतिमंद मुलांचा कोणताही कार्यक्रम असला, की तो साऱ्यांचीच मने जिंकायचा. ‘आम्ही असू लाडके’ या मतिमंद मुलांच्या विश्‍वावर आधारित चित्रपटातही त्याची छोटेखानी भूमिका होती. कोरोनाच्या काळात आरोग्याच्या तक्रारींविरोधात मोठ्या जिद्दीने तो लढला.  अजिंक्‍य हा मनमिळावू, आनंदी आणि उत्साही  तसेत   सगळ्ंयाचा लाडका होता. शाळेतील  त्याच्या  गमती स्वभावामुळे त्याचा मित्रपरीवार चांगला होता. त्याच्या अचानक जाण्याने शाळेसह मित्रांवर दुख:चा डोंगर पसरला आहे.

हेही वाचा- तो दिवस दोघी मैत्रीणींसाठी ठरला शेवटचा ; घटनास्थळावरील दृश्य मन हेलविणारे -

अजिंक्‍य ने ऋषी कपूर अशी स्व:ताची ओळख निर्माण केली होती.  खरंतर ही विशेष मुले सहज मैत्री करत नसतात. मात्र एकदा मिक्स झाले की खुप चांगल्या पध्दतीने मिक्स होतात. त्याच जाण मनाला चटका लावणार आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajinkya Choudhary died student of Chetana Apangmati Vidyalaya kolhapur