esakal | बंद म्हणजे बंद : काय राहणार सुरु आणि काय बंद वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

All district closed due to Janata curfew kolhapur marathi news

कोरोना विषाणूच्या संसर्गाशी मुकाबला करण्याचा एक भाग म्हणून पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’मुळे सारा जिल्हा बंद म्हणजे बंदच झाला.

बंद म्हणजे बंद : काय राहणार सुरु आणि काय बंद वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाशी मुकाबला करण्याचा एक भाग म्हणून पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’मुळे सारा जिल्हा बंद म्हणजे बंदच झाला. शहर व ग्रामीण परिसरातील लोक रस्त्यावर न आल्याने रस्त्यावर भरदिवसा नीरव शांतता पसरली. छोट्या गल्लीबोळापासून राष्ट्रीय महामार्गाचे रस्तेही ओस पडले. एखाद्या आपत्तीच्या वेळी घराबाहेर पडून आपत्तीला तोंड दिले जाते; पण घरातून बाहेर न पडता कोल्हापूरकरांनी कोरोनाच्या आपत्तीला तोंड देण्याची सज्जता दाखविली. संसर्ग टाळण्यासाठी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न येण्याची खबरदारी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व घटकांनी गांभीर्याने घेतली.

हे सुरू राहणार
 वृत्तपत्र, वृत्तपत्र विक्री केंद्र व इतर प्रसार माध्यमे,अन्न-धान्य दुकान (किराणा),फळे, भाजी पाला,खाद्यपदार्थ ,दूध, दूध विक्री केंद्र मेडिकल्स, दवाखाने,साखर कारखाने,इंटरनेट, मोबाईल सेवा, आयटी सेवा,गॅस, इंधन,शासकीय, निमशासकीय, कार्यालये.अग्निशमन, पाणीपुरवठा, स्वच्छता, सैनिक आस्थापना, केंद्रीय सुरक्षा बले, निमलष्करी, कार्यालये,बॅंक, एटीएम, संबंधित वित्तीय संस्था,
 पोष्ट कार्यालये,घरपोच खाद्य सेवा व इतर वस्तू घरपोच करणारी संस्था व यंत्रणा..

हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या मनाई आदेशाचा त्यांनी केला भंग अन्....

हे बंद राहणार ....
 एसटी बस,केएमटी बस,खासगी वाहतूक,एमआयडीसी, व्यापार,
उद्योग, खासगी संस्था, हॉटेल्स, रेस्टॉरंटस,सार्वजनिक प्रवासी वाहतूक
 माल वाहतूक व्यवस्था,वाहने, शैक्षणिक संस्था

हेही वाचा- मोठी बातमी : महाराष्ट्र - गोवा सीमा केली सील...

३१ पर्यंत सराफ कट्टा
सराफ बाजार ३१ मार्चपर्यत बंद राहणार असल्याचे सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी म्हटले आहे. खबरदारी म्हणून गुजरी परिसरात सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत चार सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.  दुकाने सुरू- बंद करण्यासंबंधी शासनाच्या धोरणानुसार पुढील निर्णय कळविण्यात येईल. अफवांवर विश्‍वास ठेवू नये, कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास सीपीआरशी संपर्क संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.

 हेही वाचा-सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणाले, यासाठी धुणार फुटपाथ

महत्त्वाच्या सूचना
 अत्यावश्‍यक सेवांसाठी सुरू असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्‍यक सेवा म्हणून फलक लावले जातील. 
 तहसीलदार, आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात लोकांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज करा
 सरपंच, सदस्यांनी ग्रामस्थांवर ठेवावी लागणार नजर