कोरोनाला न घाबरता, स्वत:ची काळजी घेत दुसऱ्याची पण काळजी घ्या...

Appeal from kolhapur administration regarding Corona
Appeal from kolhapur administration regarding Corona

कोल्हापूर - कोरोनाची भिती बाळगू नका. पण, आपली व दुसऱ्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने आरोग्यदूत म्हणून काम करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकांना स्वत:ची काळजी घेत दुसऱ्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज येथे केले. कोरोना प्रतिबंधासाठी शासकीय विश्रामगृहात जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद, महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

डॉ. कलशेट्टी म्हणाले, कोरोनाबाबत लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वास्तविक या रोगाला भितीने नव्हे तर खंबीरपणे आणि स्वयं काळजीने प्रतिकार केला पाहिजे. योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना सारख्या रोगाचा सक्षमपणे प्रतिबंध करू शकतो. लोकांनी आता शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात स्वच्छता राखली पाहिजे.

शहरासह गावात याचे जनजागृती करण्यासाठी प्रत्येकांने स्वयंस्फुर्तीने आणि काळजीने पुढाकार घेतला पाहिजे. स्वत:ची काळजी घेत दुसऱ्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी ज्यांना खोकला, ताप, सर्दी झाला असेल तर त्याने तात्काळ सर्व तपासण्या करणे गरजेचे आहे. हात धुतले पाहिजे, तोंडाला मास्क लावले पाहिजे यासह इतर काळजी घेतली पाहिजे. दरम्यान, गर्दीची ठिकाणी जाणे स्वत:हून टाळले पाहिजे. दरम्यान, कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. गर्दी टाळणं गरजेचं आहे. शहरातील शाळा, महाविद्यालयांसह खासगी कार्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी आरोग्यदूत बनून काम करा, असेही आवाहन डॉ. कलशेट्टी यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com