कोल्हापुरचे नवे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून किशोर पवार यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

यापूर्वीही त्यांनी करवीर प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

कोल्हापूर : गेल्या आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी पदी किशोर पवार यांची नियुक्ती झाली आहे. सध्या ते "सारथी' येथे कार्यरत होते. तसेच, यापूर्वीही त्यांनी करवीर प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. दरम्यान, दोन ते तीन दिवसात ते अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 

हेही वाचा -  Covid Update : कोल्हापुरात चार दिवसापासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट 

कोल्हापूरचे तत्कालिन अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. गेल्या आठ महिन्यापासून या जागेवर कोण येणार याची चर्चा होती. अनेकांची नावे समोर येत होती. मात्र, आज किशोर पवार यांची नियुक्ती करण्यात आली. 

हेही वाचा -  मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद :  कोल्हापुरात गोलमेज परिषदेत निर्णय 

पवार यांनी 2003 ते 2007 दरम्यान करवीर प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. 1994 मध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे तहसिलदार म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेला सुरुवात केली होती. त्यानंतर ते सोलापूर, कराडही उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या पुण्यात असून तीन ते चार दिवसात ते अप्पर जिल्हाधिकारी म्हणून आपला पदभार स्विकारतील. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: appointment of kishor pawar is new upper collector of kolhapur