कोल्हापूर - नियमांचे पालन करीत रंगला प्रति पंढरपूर वारी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

आषाढी एकादशी दिवशी कोल्हापूर ते नंदवाळ अशी प्रती पंढरपूर वारी प्रत्येक वर्षी होते. त्यात हजारो भाविकांचा सहभाग असतो.

कोल्हापूर : "निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम..." असा गजर करीत आज येथील प्रति पंढरपूर वारी सोहळा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळत केवळ 10 वारकरी पालखीसह फुलांनी सजवलेल्या एका वाहनातून नंदवाळकडे रवाना झाले.

आषाढी एकादशी दिवशी कोल्हापूर ते नंदवाळ अशी प्रती पंढरपूर वारी प्रत्येक वर्षी होते. त्यात हजारो भाविकांचा सहभाग असतो. यंदा मात्र कोरोनामुळे ही वारीसुद्धा रद्द करण्यात आली. दहाच वारकऱ्यांच्या सहभागाने पालखीचे एकाच वाहनातून प्रस्थान करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. याच निर्णयानुसार आज हा सोहळा सजला. ऋतुराज क्षीरसागर, ॲड. राजेंद्र किंकर, संतोष कुलकर्णी, अजित चव्हाण, बाळासाहेब पोवार, दीपक गौड यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी पूजन व आरती झाल्यानंतर आनंदराव लाड महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिर येथून पालखीचे नंदवाळकडे प्रस्थान झाले. 

हे पण वाचा -  पंढरपूरच्या वारीला नव्हे माहेराला नाही गेलो ः विठ्ठल भक्ताची भक्ताची घालमेल का झाली ?

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashadhi vari sohla in kolhapur