मोठी बातमी : वीस लाख रूपयांची लाच घेताना अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात 

Assistant Town Planning Officer arrested taking bribe kolhapur crime news
Assistant Town Planning Officer arrested taking bribe kolhapur crime news
Updated on

कोल्हापूर - जमिनीचे मूल्यांकन  कमी करण्यासाठी 45 लाखांची मागणी करून 20  लाखाची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकाऱ्याला आज कोल्हापुरात रंगेहाथ पकडण्यात आले. कसबा बावडा येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील सह जिल्हा निबंधक कार्यालयात आज दुपारी हा छापा टाकण्यात आला.

गणेश हणमंत माने (वय 45) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. माने याने तक्रारदाराकडे ४५ लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील २० लाख रूपये घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला सापळा रचून रंगेहात पकडले.  

 याबाबत तक्रारदाराने २२ जानेवारीला लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार खारजमा करून आज सापळा लचण्यात आला. कार्यालयाच्या खाली चहाच्या टपरीवर ही रक्कम घेत असताना ही कारवाई केली. यावेळी एक लाख रूपयांच्या दोन हजाराच्या नोटा तर उर्वरित 1900000 पाचशे रुपयांच्या नोटा असल्याचे आढळून आले
 आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur illegal abortion investigation
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Girish Mahajan latest statement on Almatti Dam
Marathi News Esakal
www.esakal.com