टॉप्स मागितल्याने मेहुणीवर चाकू हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

प्रतिकार करताना त्यांने चाकूसारख्या हत्याराने सुनैनावर हल्ला केला

इचलकरंजी : रुग्णालयाचे बिल भागविण्यास सोन्याचे टॉप्स मागितल्याच्या कारणातून चाकूने केलेल्या हल्ल्यात सुनैना अर्जुन माछरे (वय 29, आवळे गारमेंटजवळ, तारदाळ) ही जखमी झाली. या प्रकरणी मेहुणा धनंजय पोळ (जवाहरनगर) याच्यावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. 

या प्रकरणी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सुनैनाची बहीण दिव्याच्या बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. 21 ऑक्‍टोबरला डिस्चार्ज देण्यात येणार होता; पण दवाखान्याचे बिल भागविण्यासाठी पैसे नसल्याने दिव्या पोळने सोन्याचे टॉप्स विकून बिल भागविण्यास सांगितले. सोन्याचे टॉप्स धनंजय पोळ याच्याकडे असल्याने ते आणण्यासाठी सुनैना, तिची आई, वहिनी यांनी धनंजय पोळकडे टॉप्सची मागणी केली. त्यावर धनंजयने सर्वांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जात धक्काबुक्की करू लागला. त्याला प्रतिकार करताना त्यांने चाकूसारख्या हत्याराने सुनैनावर हल्ला केला. हातावर वार झाल्याने सुनैना जखमी झाली.  

हे पण वाचानदीत वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on Sister in law in ichalkaranji