कोल्हापूर - राजाराम बंधाऱ्यावरून वाहून गेलेल्या शाळकरी मुलाचा मृतदेह आज सापडला. संस्कार राहुल कुरणे (वय 12, रा. पोवार गल्ली, कदमवाडी) असे त्याचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळेलेली माहिती, कदमवाडी येथील संस्कार कुरणे व त्याचा मित्र नजीब ट्रेनर मंगळवारी सकाळी राजाराम बंधाऱ्यावर पोहण्यास गेले होते. येथील पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने प्रवाहात दोघे अडकले. यातील नजीब ट्रेनरला येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या सदस्यांनी बाहेर काढले. मात्र संस्कार वाहून गेला होता. त्याचा परिसरातील नागरिकांनी व अग्निशामक दलाने शोध सुरू केला होता.
हे पण वाचा - ...तर कोल्हापुरी हिसका दाखवावा लागेल
दरम्यान, आज शिये पुलाजवळील जॅकवेलजवळ संस्कारचा मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसून आला. अग्निशामक दलाचे जवान मनीष रणभिसे, सुनील वाईंगडे, मधुकर जाधव, प्रमोद मोळे, अभय कोळी, सुनील यादव यांनी मृतदेह पाण्यातून काढून शिरोली पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी याची माहिती पालकांना दिली. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. संस्कारच्या मागे आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.24) आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.