esakal | गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस! 
sakal

बोलून बातमी शोधा

Bangalore Biocon Company are doing research corona antidote

तीन ते चार छोट्या कंपन्या एका मोठ्या कंपनीच्या सहकार्याने कोरोना विषाणूवर लस विकसित करण्याच्या कामात गुंतल्या आहेत.

गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : कोरोना विषाणूच्या महामारीला रोखण्यासाठी प्रतिबंधक लस शोधून काढण्यात यश येण्याची आशा निर्माण झाली आहे. बंगळुरातील बायोकॉन कंपनीचे प्रमुख किरण मजुमदार शहा यांनी याला दुजोरा दिला आहे. कोरोना नियंत्रणासाठी भारतातच लस तयार करण्यात येत असून या वर्षातच ती उपलब्ध होईल, असेही त्या म्हणाल्या. 

तीन ते चार छोट्या कंपन्या एका मोठ्या कंपनीच्या सहकार्याने कोरोना विषाणूवर लस विकसित करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. लवकरच यात यश येईल, यावर आमचा विश्वास आहे. लस तयार झाल्यानंतर जनतेत विश्वासाची भावना निर्माण होईल. या रोगावर औषध आल्याचे समजल्यास सामान्य जनतेचा या रोगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. बायोकॉन कंपनीही औषध निर्मितीच्या कामात सहभागी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

हे पण वाचा -  कुटुंब नियोजनावर असा झाला आहे कोरोनाचा परिणाम!

प्लाझ्मा थेरपीबाबत त्या म्हणाल्या, ""प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याची भारतात काही उदाहरणे आहेत. 1918 च्या स्पॅनिश तापासाठी प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली. तसेच कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांच्या रक्त संकलनाच्या विषयावर मी काही राज्यांशी चर्चा केली आहे. कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त मानली जाते. राष्ट्रीय पातळीवरील लॉकडाउन, विलगीकरणाची प्रणाली कोरोनाच्या प्रसारावर अंकुश ठेवण्यास उपयुक्त ठरली आहे. देशात व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. देशातील 90 टक्के जनता 60 वर्षाच्या आतील असून कोरोनामुळे मृत झालेल्या 80 टक्के व्यक्‍ती 60 वर्षापेक्षा अधिक वयाच्या आहेत.'' 

हे पण वाचा -  कोरोनाशी लढणार आता ही गोळी 
 

go to top