मजुरांच्या तांड्याला मधमाशांनी घेरले ; साहित्य टाकून जीवाच्या आकांताने पळ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

अनेक प्रवाशानी जीव मुठीत घेऊन पळ काढत होते. मधमाश्‍यांच्या हल्ल्याचा अधिक फटका भटकंती करणाऱ्या तांड्यातील नागरिकांना बसला.

नेसरी (कोल्हापूर) - तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे नेसरी-कोवाड रस्त्यावरील सरकारी बागेजवळ वडाच्या झाडावर असलेल्या मधमाशांनी आज सकाळी आठच्या दरम्यान अचानकपणे वैरण आणण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांसह प्रवाशी, नागरिकांवर हल्ला केला. 

नेसरी-कोवाड रस्ता वर्दळीचा असल्यामुळे अनेक प्रवाशांची ये-जा सुरू असते. मधमाशांनी पादचारी, मोटारसायकलस्वारांना लक्ष्य केले होते. दिवसभर मधमाशांचा हल्ला सुरू होता. यामध्ये तारेवाडी ग्रामपंचायत सदस्या व पतीसह अन्य दोन नागरिक जखमी झाले. अनेक प्रवाशानी जीव मुठीत घेऊन पळ काढत होते. मधमाश्‍यांच्या हल्ल्याचा अधिक फटका भटकंती करणाऱ्या तांड्यातील नागरिकांना बसला.

हे पण वाचाओबीसी समाज मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यास सहकार्य करणार ; संभाजीराजे छत्रपती

 सकाळी आठ वाजताच्या सुमारास पन्नास ते साठ लोकांचा तांडा नेसरीहून कोवाडकडे जात असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी संसारोपयोगी साहित्य रस्त्यावर टाकून जीव वाचविण्यासाठी मुलाबाळांसह पळ काढावा लागला. दुपारच्या वेळी मधमाशा काहीशा शांत झाल्या होत्या. सायंकाळी पाचनंतर पुन्हा मधमाशांनी हल्ला सुरू केला. जनावरांना चारण्यासाठी घेऊन गेलेल्या पशुपालकांमध्येही भीतीचे वातावरण होते. मधमाशांचा हल्ला इतका भयानक होता की मधमाशांचा कळप घरापर्यंत पाठलाग करत होता. मोटारसायकली रस्त्यावर टाकून पळ काढण्याची वेळ अनेकांवर आली. 

हे पण वाचाकोल्हापुरात दोन ऑक्‍टोबरला होणार धनगर आरक्षण गोलमेज परिषद

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bee attack on workers in kolhapur gadhinglaj