
देशात 3 मेपर्यंत लॉकडाउन असल्यामुळे घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या मोबाईल आणि टीव्ही ही दोनच मनोरंजनाची साधने बनली आहेत. परिणामी मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढत आहे.
बेळगाव - लॉकडाउनमुळे अनेक जण घरातच बंदीस्त झाले आहेत. यामुळे मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक गेम खेळण्यासह सतत मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे अनेकांच्या मानसिकतेत बदल होत आहेत. यामुळे केवळ मोबाईल पाहण्यापेक्षा इतर खेळ किंवा पुस्तके वाचण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे.
देशात 3 मेपर्यंत लॉकडाउन असल्यामुळे घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या मोबाईल आणि टीव्ही ही दोनच मनोरंजनाची साधने बनली आहेत. परिणामी मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या स्मार्ट फोनवर कॅंडीक्रश, स्पीड रेसिंग, अँग्री बर्ड, टेम्पल रन, स्नेक, रेस, क्रिकेट वर्ल्ड, फुटबॉल, तीनपत्ती अशा गेम्सची चलती आहे. यासंबंधी मानसशास्त्रज्ञांशी चर्चा केली असता, त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचा इशारा दिला. सतत मोबाईलमध्ये राहिल्याने मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. लवकर उत्तेजित होणे, राग येणे, भावना अनावर होणे, चिडचिड वाढणे, मन एकाग्र न होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. करमणूक करण्यापासून ते हिंसक वळणावर सोडणारे अनेक गेम्स आपल्या लहान मुलांचे भावविश्व कोमेजून टाकत आहेत. तासन्तास गेम्स खेळल्यामुळे मानसिकतेत बदल होत असल्याचा इशारा मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.
लॉकडाउन काळात पालकांपेक्षा लहान मुले जास्त मोबाईल वारताना दिसत आहेत. मोबाईलची इत्यंभूत माहिती लहान मुलांना आहे. त्यात एखाद्या दिवशी मोबाईल हाताळायला मिळाला नाही की, मुलांची चिडचिड वाढते. मोबाईल गेमचे हे वेड अभ्यासावरही परिणाम करणारे ठरत असल्याचे चित्र आहे.
हे पण वाचा - गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!
महिनाभरापासून लॉकडाउन असल्याने अनेकजण घरी बंदीस्त आहेत. मनोरंजनासाठी टिव्ही आणि मोबाईलचा वापर केला जात आहे. मात्र मोबाईलच्या अधिक वापरामुळे मानसिकतेत बदल होत आहे. यासाठी प्रत्येकाने इतर खेळात किंवा कामात स्वत:ला गुंतवून ठेवले पाहिजे.
-प्रा. राजेंद्रकुमार कट्टे, मानसशास्त्र विभागप्रमुख, बिम्स
हे पण वाचा - जवानाला थर्ड डिग्री देणे पोलिस उपनिरीक्षकांना पडले चांगलेच महागात