'भानू अथय्या यांच्या कलात्मक स्मारकासाठी प्रयत्नशील राहू'

संभाजी गंडमाळे
Thursday, 15 October 2020

वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी मायभूमीत 2009 सालच्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

कोल्हापूर - भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानुमती राजोपाध्ये तथा भानू अथय्या (वय 91) यांचे आज मुंबई येथे निधन झाले. भानू अथय्या मुळच्या कोल्हापूरच्या. त्यांच्या निधनानंतर येथील विविध स्मृतींना उजाळा मिळाला. महापौर निलोफर आजरेकर यांनी कलापुरात त्यांच्या कलात्मक स्मारकासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. 

येथील महाद्वार रोडवरील राजोपाध्ये वाड्यात जन्मलेल्या भानुमतींना घरातच कलाशिक्षण मिळाले. 1940 च्या सुमारास "मोहिनी' चित्रपटातही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. पुढे मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांच्या करिअरला प्रारंभ झाला. 1956 मध्ये "सीआयडी'साठी त्यांनी पहिल्यांदा वेशभूषाकार म्हणून काम केले आणि पुढे "प्यासा', "कागज के फूल'पासून ते "स्वदेस', "लगान' अशा दीडशेहून अधिक चित्रपटांना त्यांच्या कल्पक वेशभूषांनी सजविले. चित्रपटातील वेशभूषा पाहिल्या की, त्या भानू अथय्या यांच्याच असेच एक समीकरण झाले. 1982 साली प्रदर्शित झालेल्या "गांधी' चित्रपटासाठी त्यांना मानाचा सर्वोच्च ऑस्कर पुरस्कार मिळाला. 

वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी मायभूमीत 2009 सालच्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2010 साली येथील विविध संस्थांतर्फे नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे यांच्या हस्ते सत्कार गौरव झाला. यावेळी त्यांनी लिहिलेल्या "द आर्ट ऑफ कॉश्‍च्युम डिझाईनिंग' या पुस्तकाचे प्रकाशनही झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्‍टस्‌ (कोल्हापूर शाखा), क्रीडाई, चेंबर ऑफ कॉमर्स, हॉटेल मालक संघ, वूमन डेव्हलपमेंट फाऊंडेशन, रोटरी मूव्हमेंट, असोसिएशन ऑफ आर्किटेक्‍ट अँड इंजिनिअर्स, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरिअर डिझायनर्स आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम झाला होता. कार्यक्र

हे पण वाचामराठा आरक्षणासाठी लाल महाल ते लाल किल्ला आंदोलन छेडणार ; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

 

माच्या निमित्ताने हॉटेल पॅव्हेलियनचा मधुसूदन हॉल व्यासपीठासह कलात्मकतेने सजविण्यात आला होता. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhanu athaiya passed away