शिवसेनेच्या भगव्या रॅलीचा भारत बंदला पाठिंबा

bharat bandh by holding Shiv Sena spontaneously participated bhagvi rally in kolhapur
bharat bandh by holding Shiv Sena spontaneously participated bhagvi rally in kolhapur

कोल्हापूर : शहरातून भगवी रॅली काढून शिवसेनेने भारत बंदमध्ये आज उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. शहर व जिल्हा शिवसेनेने वेगवेगळी रॅली काढून कोल्हापूर बंदचे आवाहन केले. 
शिवसेना आज पहिल्यांदाच कॉंग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय, आम आदमी, किसान सभ, संघर्ष समितीसोबत राहून "मोदी सरकार चलो जाओ' च्या घोषणेला साथ दिली. जिल्हाप्रमूख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेअकराच्या सुमारास भवानी मंडप येथून मोटारसायकल रॅलीस सुरवात झाली. फडफडणारे भगवे, झेंडे, कार्यकर्त्याच्या सळसळता उत्साह अशा वातावरणात रॅली निधाली. जी दुकाने खुली होती त्यांना बंद करण्याचे आवाहन करत रॅली पुढे निघाली.

दुकानदारांनी शिवसैनिकांच्या आवाहनास प्रतिसाद दिला. स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानक, परीख पूल, बागल चौक, बिंदू चौकात रॅलीची सांगता झाली. विनायक साळोखे, विराज पाटील, मंजित माने, हर्षल सुर्वे,राजेंद्र पाटील, विनोद खोत,दिपाली शिंदे, अवधूत साळोखे, मेघना पेडणेकर,राजू सांगावकर,संजय जाधव, रणजित आयरेकर,अमित शिंदे संदीप पाटील आदि रॅलीत सहभागी झाले. 

हेही वाचा- घोषणा करणारे चंद्रकांत पाटील पंतप्रधान की कृषिमंत्री -
शहर शिवसेनेच्या वतीने सोन्या मारूती चौक येथून रॅलीस सुरवात झाली. उत्तरचे शहप्रमूख रविकिरण इंगवले, उमेश पाटील, राकेश माने, राहूल इंगवले, विक्रम पाटील, कपिल केसरकर, दिपक गौड, उमेश रेळेकर, संजय मांगेलकर आदि सहभागी झाले. हाती भगवे झेंडे घेतलेले कार्यकते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाली. बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारूती चौक, अन्य प्रमूख मार्गावरून फिरून रॅलीची बिंदू चौक येथे सांगत झाली. 

मावळा ग्रुपचाही सहभाग 
डोक्‍यावर गांधी टौपी त्यावर "आम्ही शेतकरी' आणि हाती प्रतिकात्मक नांगर घेऊन मावळा ग्रुपचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाली. शहराच्या प्रमूख मार्गावरून रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. मावळा ग्रुपचे कार्यकर्ते बिंदू चौक येथील आंदोलनात सहभागी झाले. 

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com