ब्राह्मणांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे ; कोल्हापुरात ब्राह्मण गोलमेज परिषदेत 14 ठराव मंजूर

bhraman golmej parishad in kolhapur 14 resolution approved in this parishad in kolhapur
bhraman golmej parishad in kolhapur 14 resolution approved in this parishad in kolhapur

कोल्हापूर : शिवसेना भाजप हा कायमच ब्राह्मणांना गृहित धरतो. हा समाज भाजपचा मतदार म्हणून कॉंग्रेसकडून नेहमीच ब्राह्मणांना डावलले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाज भरडला जात आहे. समाजातील तरुणांना व्यवसायासाठी कर्ज, वैद्यकीय मदत, शैक्षणिक मदत यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य 14 ठराव मंजूर केले. 

हॉटेल पॅव्हेलियनमध्ये ब्रह्म महाशिखर परिषदेच्या वतीने ब्राह्मण गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ब्रह्म शिखर परिषदेचे अध्यक्ष निखिलभाऊ लातूरकर प्रमुख उपस्थित होते. मंत्री जयंत पाटील यांना 'ब्रह्म मित्र' पुरस्कार ब्राह्मण समाजासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना 'ब्रह्म मित्र' पुरस्काराने नांदेड येथे गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अर्थिक विकास महांडळाच्या स्थापनेसह महत्वाचे ठराव मंजूर केले.

दरम्यान ब्रह्म शिखर परिषदेचे प्रवक्ते मकरंद कुलकर्णी म्हणाले, 'संपूर्ण राज्यात समाजाचे 60 लाख मतदार आहेत. 43 विधानसभा मतदारसंघात आम्ही परिणामकारक भूमिका निभावू शकतो.' विश्‍वजीत देशपांडे म्हणाले, 'देशभरात ब्राह्मण समाजासाठी विविध योजना आहेत. कर्नाटका, तेलंगाणा, उत्तरखंडातील ब्राह्मण समाजासाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्या पातळीवर महाराष्ट्रातही ब्राह्मणांसाठी योजना राबवल्या जाव्यात. समाजाला दिशा देणारा कायदा करावा. कोणत्याही जातीच्या महापुरुषांची बदनामी टाळणार कायदा करावा. स्वातंत्र्यवीर सावरकर, आण्णाभाऊ साठे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना "भारतरत्न" द्यावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या. 


मंजूर प्रमुख ठराव असे 

- ब्राह्मण समाजाला अल्पसंख्यांक दर्जा मिळावा. 
- आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. 
- पुरोहितांना मानधन द्यावे. 
- वर्ग 2 इनामी जमिनी वर्ग 1 करुन खाजगी मालकीच्या करुन   देणे. 
- महापुरुषांच्या बदनामीविरोधात कायदा करणे. 
- पुण्यातील दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरी यांचे पुतळे पुन्हा बसवावेत. 
- श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांचे श्रीवर्धन येथे स्मारक उभा करावे. 
- जिल्हास्तरावर ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारावे. 
- छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकर पूर्ण व्हावे. 
- पंढरपूर येथील श्री विठ्ठल, श्री रुक्‍मिणी मंदिरात बडवे, उत्पात यांना पुन्हा सेवेकरी म्हणून रुजू करुन घ्यावे.

यावेळी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. परिषदेसाठी सुरेश मुळे, मनोज कुलकर्णी, ऍड मंदार जोशी, विजय जमदग्नी, विश्‍वजीत देशपांडे, प्रा. काकासाहेब कुलकर्णी, सु. द. पुराणिक, सुरज कुलकर्णी, गजानन जोशी, अंजली जोशी, संजिवनी पांडे, ज्ञानेश्‍वर पंचवाद्य, ईश्‍वरी जोशी, निलेश कुलकर्णी, मोहन देशपांडे, मंदार जोशी, प्रदीप अष्टेकर, दिपक आपटे, प्रसाद कुलकर्णी, विद्याधर कुलकर्णी, स्वाती पाताळे, प्रसाद कुलकर्णी, प्राची परांडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com