लवकरच राज्यातील दोन मंत्री देणार राजीनामा ; चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

bjp leader chandrakant patil maharashtra government kolhapur news
bjp leader chandrakant patil maharashtra government kolhapur news

कोल्हापूर : महाविकास आघाडीमधील एका मंत्र्याचा राजीनामा यापूर्वी झाला आहे. दुसऱ्या मंत्र्यांचा राजीनामा कधीही होईल आणि तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा आज-उद्या नक्की झाला पाहिजे, असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध चंद्रकांता पाटील यांनी केला. ज्यावेळेला दीड वर्षात तीन-तीन राजीनामे होतात, असे अलबेल सरकार कसे चालेले, असा टोलाही  पाटील यांनी आज लगावला. कोल्हापुरा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

श्री पाटील म्हणाले, वाझेंच्या विषयात दोन एजेंन्सी काम करत आहेत. त्या अतिशय परिणामकारक काम करत आहे. यातून खूप लांबपर्यंत मूळं असल्याचे उघड होईल. ती खणून काढण्यासाठी एनआयए आणि एटीएस यशस्वी होतील. आज महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. कोण दिल्लीला गेले आहेत. तर कोण वर्षावर गेले आहेत. त्यामुळे, यापूर्वी एका मंत्र्याचा राजीनामा झाला आहे. आणखी दोन जणांचा राजीनामा लवकरच होईल, असे संकेतही श्री पाटील यांनी दिले. तर, विधानसभा अध्यक्ष निवडणूक झाली नाही. जे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे होते. कॉंग्रेस काय पेढे वाटत असतील का? असा सवालही त्यांनी केला. 

सचिन वाझे यांना पाठीशी घालू नये, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. पण, काही पोलिसांना खलनायक केले जात असल्याचे नाना पटोले यांच्या या वकतव्यावर आणि डेलकर प्रकरण भाजपकडून दाबले जात असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, यावर बोलताना श्री पाटील म्हणाले, वास्तविक असं वक्तव्यक करुन श्री पटोले स्वत:चे हसं करुन घेत आहेत. कृत्रिमपणे का असेना पण सरकार आहे. पण त्यातील किती लोक त्यांच्यासोबत आहेत हे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली असती तर त्यांना कळले असते. पण महाविकास आघाडी सरकार घाबरले आणि त्यांनी निवडणूक घेतली नाही. अशीही टीका श्री पाटील यांनी केली. 
 

मुश्रीफांना टोला  
सरकारमध्ये समन्वय नसेल तर चंद्रकांत पाटील यांनी अविश्‍वास ठराव आणावा. त्यांना आम्ही आमची ताकद दाखवून देवू असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणता या प्रश्‍नावर चंद्रकांत पाटील म्हणले, विधानसभा अध्यक्षाची निवड करुन ताकद दाखविण्याची संधी होती. ती मुश्रीफांनी का घालवली, असा टोलाही श्री पाटील यांनी लगावला. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com