गडहिंग्लजला भाजपचे धरणे

BJP Movement Against State Government in Gadhinglaj Kolhapur Marathi News
BJP Movement Against State Government in Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि शेतकरी कर्जमाफीच्या फसव्या धोरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रांत कार्यालयासमोर दिवसभर हे आंदोलन झाले. नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

शासनाच्या धोरणाच्या विरोधात भाजपने आज राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. गडहिंग्लज तालुका भाजपतर्फेही प्रांत कार्यालयासमोर धरणे धरण्यात आली. प्रांत कार्यालयासमोर मंडप उभा करण्यात आला होता. सकाळी अकराला भाजपचे कार्यकर्ते आंदोलनाला बसले. शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रांत कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. यावेळी तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, जिल्हा परिषद सदस्या अनिता चौगुले, पंचायत समिती सदस्या जयश्री तेली, एल. टी. नवलाज, अजित जामदार, केरबा पाटील, शामराव सुतार, पांडुरंग देवार्डे यांची भाषणे झाली. 

दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याला आता बगल दिली जात आहे. अटीमुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, तसेच प्रामाणिक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. शासनाने अटी व शर्तींऐवजी संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिस प्रशासनाचा गुंड प्रवृत्तीवर अंकुश राहिलेला नाही. महिला व युवती असुरक्षित आहेत. शासनाने अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश परुळेकर, जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे, नगरसेवक दीपक कुराडे, रमेश रिंगणे, दीपक पाटील, जवाहर घुगरी, आनंद पेडणेकर, तुषार मुरगुडे, विठ्ठल भमान्नगोळ, डॉ. बेनिता डायस, सुनील गुरव, चंद्रकांत सावंत, संदीप नाथबुवा, प्रितम कापसे, राजेंद्र पाटील, संतोष तेली, दिगंबर विटेकरी, मार्तंड जरळी, अशोक पांडव, युवराज बरगे, संदीप कुरळे, अमर पोटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com