`महाविकास आघाडीचे तीन चाकी सरकार लवकरच पडणार`

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, नव्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी, सरकारचे ठळकपणे दिसणारे अपयश, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना आदी प्रश्‍नांबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने मंगळवारी प्रांत कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. 

इचलकरंजी - शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, नव्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी, सरकारचे ठळकपणे दिसणारे अपयश, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना आदी प्रश्‍नांबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने मंगळवारी प्रांत कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. 

हे पण वाचा - सध्या एटीएममध्ये होतोय सारखा असा घोळ...

यावेळी महाविकासआघाडी सरकारच्या कारभाराचा आंदोलकांनी भाषणात खरपूस समाचार घेतला. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले. राज्यातील सध्याचे सत्ताधारी सरकार कल्याणकारी योजना बंद करत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून याचा प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना काहीच लाभ होणार नाही. या फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

हे पण वाचा - सातवीची सामान्य मूल्यमापन परीक्षा; येथे पाहा प्रश्‍नपत्रिकेचे स्वरुप

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार होत असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याविरोधात जाणीवपूर्वक चुकीचा प्रचार सुरू असून जातीय तेढ निर्माण केला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे तीन चाकी सरकार लवकरच पडणार असून भाजपचे मजबूत सरकार राज्याच्या सत्तेत येईल, असा विश्वास प्रदेश सरचिटणीस श्री. हाळवणकर यांनी आंदोलकांसमोर बोलताना व्यक्त केला. 
आंदोलनात नगराध्यक्षा अलका स्वामी, वैशाली नायकवाडे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, हिंदुराव शेळके, नगरसेवक अजितमामा जाधव, मनोज हिंगमीरे, किसन शिंदे, सतीश डाळ्या, सुनील महाजन, पै.अमृत भोसले, गीता भोसले, पुंडलिकभाऊ जाधव, मिश्रीलाल जाजू, किरण दंडगे, आकाशा मुल्ला, किसन शिंदे, धोंडीराम जावळे, शहाजी भोसले, पांडुरंग म्हातुकडे, युवराज माळी, राजेंद्र राशिनकर, शफिक बागवान, सुकूमार पाटील, दीपक पाटील, सागर कचरे, प्रविण पाटील, अमर कांबळे आदी सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp protest in ichalkaranji