ब्रेकिंग- दीड लाखांची लाच घेताना पंटरसह मंडळ अधिकारी जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

दीड लाख रूपयांची लाच घेताना जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील मंडळ अधिकार्यासह त्याच्या पंटरला लाचलुचपत विधभागाने रंगेहाथ पकडले आहे.

कोल्हापूर - दीड लाख रूपयांची लाच घेताना जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील मंडळ अधिकार्यासह त्याच्या पंटरला लाचलुचपत विधभागाने रंगेहाथ पकडले आहे. आयुबखान दस्तगीर देसाई, (वय 54) असे लाचलुचपत विभागाने पकडलेल्या मंडळ अधिकार्याचे नाव आहे तर, अमोल प्रशांत कोळी (वय 32) असे त्याच्या पंटरचे नाव आहे.

हे पण वाचा - Happy Birthday ; गड-किल्ल्यांसाठी अहोरात्र झटणारे संभाजीराजे छत्रपती 

याबाबत अधिक माहिती अशी, क्रारदार यांची शेती असून त्यातील पाचशे ब्रास माती त्यांना वीट भट्टीसाठी विकायची होती. त्यासाठी रॉयल्टी काढायची असल्याने त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या शेतीच्या मातीचा पंचनामा करून योग्य अहवाल तहसीलदार  शिरोळ यांना सादर करण्यासाठी देसाईने त्यांच्याकडे एक लाख साठ हजरा रूपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रादार यांनी याबाबत लाचलुचपत विभागाला माहिती दिली. माहितीची खातरजमा करून लाचलुचपत विभागाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना देसाईसह त्याच्या पंटरला रंगेहाथ पकडले. 

हे पण वाचा - व्हिडिओ : भाच्याने घेतला स्टार, मामाने उडवला हवेत बार.... 

ही कारवाई पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील , सहायक पोलिस निरीक्षक शामसुंदर बुचडे, नवनाथ कदम, मयूर देसाई  आणि संग्राम पाटील यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: board officer arrested because taking bribe in kolhapur sirol