Happy Birthday ; गड-किल्ल्यांसाठी अहोरात्र झटणारे संभाजीराजे छत्रपती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

संभाजी राजे छत्रपती यांचा आज 50 सावा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. 

कोल्हापूर - महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांसाठी अहोरात्र कार्य करणारे व्यक्तीमत्व म्हणजे खासदार संभाजीराजे छत्रपती. त्यांच्या या कार्यातूनच त्यांना महाराष्ट्रातील किल्ल्यांचे ब्रॅन्ड अंब्यासीडर म्हणून ओळखले जाते. शिवरायांची कीर्ती जगभरात पोहोचविण्यासाठी ते अपार कष्ट घेत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे न भूतो न भविष्यती असा दुर्गराज रायगडावर दरवर्षी साजरा होणारा #शिवराज्याभिषेक आणि दिल्लीमध्ये साजरी होणारी भव्यदिव्य #शिवजयंती होय. याच संभाजी राजे छत्रपती यांचा आज 50 सावा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. 

हे पण वाचा - सावधान ! तर डॉक्‍टरांवर होणार आता कारवाई .. का ते वाचा..

राजर्षी शाहूमहाराजांप्रमाणेच संभाराजेही तळागाळातल्या लोकांमध्ये सहज मिसळतात. त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतात आणि सोडवितात देखील. रायगडाच्या पंचक्रोशीत राहणाऱ्या चेतन अवकीळकर सारख्या सर्व सामान्य तरुणाला हेलिकॉप्टरमधून रायगडाचे हवाई दर्शन घडवून त्याला सुखद अविस्मरणीय अनुभव देखील संभाजीराजेच देऊ शकतात. मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. राजधानी दुर्गराज रायगड संवर्धनाची मोहीम त्यांनी हाती घेतली. शिवभक्तांचं प्रेरणास्थान असलेल्या रायगड संवर्धनाचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड प्राधिकरणांतर्गत जोमाने सुरु आहे. या कामामुळेच शिवरायांच्या-रायगडाच्या इतिहासाच्या अनेक शृंखला नव्याने नक्कीच समोर येतील. खासदार संभाजीराजे यांनी यावर्षीचा वाढदिवस रायगडावर दुर्गपरिषद घेऊन साजरा करण्याचा मानस केला आहे. 

हे पण वाचा - चालकाचे प्रसंगावधान आणि दैव बलवत्तर होते म्हणून टळला हा अनर्थ...

समाजात घडणाऱ्या घटनांवर संभाजीराजे नेहमीच आपले मत व्यक्त करत असतात. त्यावरूनच ते मनाने संवेदनशील असल्याचे पाहायला मिळते. हिंगणघाटच्या घटनेवरही त्यांनी आपल्या फेसबूकवरून भावनांना वाट करून दिली व संशयीत आरोपील कडक शासन व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली. अवतीभवती घडाणाऱ्या घटनांवर संभाजीराजे आपले परखड मत मांडत असताता. ते केवळ मत मांडून थांबत नाहीत तर त्याचा पाठपुरावादेकील करत असल्याचे काही उदाहणावरून पाहायला मिळाले आहे. 

हे पण वाचा - व्हिडिओ : भाच्याने घेतला स्टार, मामाने उडवला हवेत बार.... 

सध्या संभाजीराजांनी राबविलेल्या गढ-किल्ले सुशोभिकरण मोहिमेमुळे तरूणांमध्ये ते खूप लोकप्रिय झाले आहेत. अनेक तरूण या मोहिमेत सक्रिय सहभाग घेहून किल्ले स्वच्छतेसाठी श्रमदान करत आहेत. या मोहिमेमुळे किल्यांचे रूपडे पालटत आहे. शिवाय किल्ला पर्यनामध्ये वाढही होत आहे. 

हे पण वाचा - आघाडी सरकाची कर्जमाफी चार गावातील केवळ १७ शेतकऱ्यांच 

संभाजीजाजेंच्या वाढदिसाच्या निमित्ताने राज्यभरात "युवराज संभाजीराचे हेल्थ फौंडेशनच्या वतीने विविध कार्यकमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yuvraj sambhajiraje chhatrapati birthday