कोल्हापुरात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 

Burning of a symbolic statue of Energy Minister Nitin Raut in kolhapur msedcl marathi news
Burning of a symbolic statue of Energy Minister Nitin Raut in kolhapur msedcl marathi news
Updated on

कोल्हापूर  : घरगुती वीज बिल माफ होत असल्याच्या निषेधार्थ ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे वीज बिल भरणार नाही कृती समितीतर्फे मिरजकर तिकटी येथे आज दहन करण्यात आले. भरणार नाही भरणार नाही वीज बिल भरणार नाही, अशी घोषणा यावेळी देण्यात आली. 

लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले माफ करावीत, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. त्याकरिता समितीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली असून, महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलनही केले. शहरात वाहनांची फेरी काढून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

वीज बिल माफी संदर्भात शासन चिडीचुप्प असल्याने समितीने आज ऊर्जामंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायंकाळी समितीचे सदस्य मिरजकर तिकटी येथे एकत्र आले त्यांनी महावितरण व शासनाविरुद्ध घोषणाबाजी करत ऊर्जामंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

वीज ग्राहकांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनच्या काळातील बिल भरू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच शासनाने वेळीच वीज बिल माफीचा निर्णय घेतला नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी निवास साळोखे, बाबा पार्टे, माजी नगरसेवक सत्यजित कदम व सुनील कदम, विजयसिंह पाटील, अशोक भंडारे, गीतांजली डोंबे, डॉ. चौगुले, सुभाष जाधव, जोतराम घोडके उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com